पाकिस्ताननंतर श्रीलंकेच्या संसदेत येणार अविश्वास ठरावाचा प्रस्ताव

पाकिस्ताननंतर श्रीलंकेच्या संसदेत येणार अविश्वास ठरावाचा प्रस्ताव

भारताचा शेजारी देश सध्या गंभीर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. नुकतेच श्रीलंकेने स्वतःला दिवाळखोर म्हणून घोषित केले. त्यानंतर आता श्रीलंकेतील सर्वात मोठा विरोध पक्ष समागी जना बालवेगयाने (SJB) राजपक्ष सरकारविरोधात अविश्‍वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर अध्यक्ष गोटाबया राजपक्ष यांच्यावर महाभियोग देखील चालवण्यात येणार आहे.

श्रीलंकेच्या प्रमुख विरोधकांनी बुधवार, १३ एप्रिल रोजी विद्यमान सरकारच्या विरोधात अविश्वास आणि महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी केली. राजपक्षे यांच्या सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणून आर्थिक संकटामुळे अडचणींचा सामना करणार्‍या जनतेच्या चिंतेचे निराकरण करण्यात अपयशी ठरून अडथळे आणलेल्या नेत्यावर महाभियोग चालवला जाणार आहे.

प्रमुख विरोधी पक्ष एसजेबीच्या सुमारे ५० सदस्यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. या प्रस्तावावर आणखी विरोधी पक्ष सामील होण्याची वाट पाहत आहेत. श्रीलंकेच्या संसदेत अविश्‍वास ठराव आणण्यासाठी विरोधकांना आणखी चाळीस सदस्यांची गरज आहे.

हे ही वाचा:

गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

शरद पवारांनी पुन्हा केला बाबासाहेब पुरंदरेंना विरोध

श्रीलंकेपाठोपाठ नेपाळचाही घात; त्यात चीनचा हात

नवाब मलिकांची १४७ एकर जमीनीसह आठ मालमत्ता जप्त

विरोधी पक्ष नेते साजिथ प्रेमदासा यांनी ट्‌विटरवर या संदर्भात सांगितले आहे. ‘बदल झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही,’ असे म्हणून अविश्‍वास ठराव आणि महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version