शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या एका व्हायरल केलेल्या व्हीडिओचा संबंध असल्याकारणावरून युवा सेनेचे कार्यकर्ते साईनाथ दुर्गे यांना अटक करण्यात आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची एक लिंक युवासेना सोशल मीडिया आर्मीच्या ग्रुपवर टाकल्यामुळेच दुर्गेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार ही लिंक त्या ग्रुपवर टाकल्यानंतरच सगळीकडे हा व्हिडिओ पसरला. विनायक डायरे नावाच्या तरुणाने त्याच्या वैयक्तिक मोबाईलमधून मातोश्री या पेजवर हा व्हिडिओ आधीच प्रसारित केला होता. या व्हिडिओची लिंक दुर्गे यांनी युवासेना सोशल आर्मीच्या ग्रुपवर शेअर केली होती.
साईनाथ दुर्गे हे युवासेना सोशल मीडिया सेलचे प्रमुख आहेत. पोलिसांनी साईनाथ दुर्गे यांच्या घर आणि कार्यालयात सर्च ऑपरेशन केलं. काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस पोलिसांनी ताब्यात घेतल्या. लॅपटॉप आणि इतर तांत्रिक गोष्टी पोलिसांकडून तपासायला सुरुवात. साईनाथ दुर्गे यांना रात्री उशिरापर्यंत अटक केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती, त्याप्रमाणे त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, दहिसर आणि समता नगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तीन गुन्हे दाखल आहेत. पहिला गुन्हा शीतल म्हात्रे यांनी स्वतःहून दहिसर पोलीस ठाण्यात केला आहे, त्यानंतर दुसरा गुन्हा समता नगर पोलीस ठाण्यात महिला पदाधिकारी यांनी दाखल केला तिसरा गुन्हा आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राजू सुर्वे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
हे ही वाचा:
मालाडच्या आप्पापाडा येथे भीषण आग, धुराने सगळा परिसर काळवंडला
ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि या शिवसेनेमध्ये फरक आहे
राज्यातील कैद्यांना आता ‘तुुडुंब’वास; सगळ्या तुरुंगात गर्दी
सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई एकनाथ शिंदेसोबत
शीतल म्हात्रे यांनी दाखल केलेल्या गुन्हयात आता पर्यत ४ जणांना अटक करण्यात आली आहे ¡)अशोक मिश्रा ¡¡)मानस कुंवर ¡¡¡) विनायक डायरे (कल्याण) ¡v) रवींद्र चौधरी या चौघांना अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान दहिसर पोलिसांनी ठाकरे गट युवा सेना कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, चौकशी नंतर त्यांचा जबाब नोंदवून सोडण्यात आले. शीतल म्हात्रे या सोमवारी दुपारी मुंबई पोलीस आयुक्तलयात आलेल्या होत्या, त्यांनी सहपोलिस आयुक्त (कावसु) सत्यनारायण चौधरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले, निवेदनात त्यांनी मोटारसायकल वर दोन जण आपला पाठलाग करीत होते, असे म्हटले आहे, शिवाजी पार्क पर्यत या दोघांनी पाठलाग केला होता असे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी तपास करण्यात येणार येत आहे.