दापोलीतील साई रिसॉर्टशी आपला काहीही संबंध नाही असे उद्धव ठाकरे गटाचे ऍड अनिल परब यांनी वारंवार सांगितले होते. परंतु ईडीने दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी कारवाई करत अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम याना ताब्यात घेतले आहे. साई रिसॉर्ट खरेदीचे सर्व व्यवहार अनिल परब यांनी सदानंद कदम यांच्या मार्फत केले होते. ईडीने केलेल्या चौकशीत या सर्व प्रकरणाचा अनिल परब यांची या अगोदरही मॅरेथॉन चौकशी करण्यात आली होती. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट प्रकरणाचा सातत्त्याने पाठपुरावा केला होता. या कारवाईनंतर आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सदानंद कदम यांच्या अटकेची माहिती दिली आहे. दापोली साई रिसॉर्ट खरेदी घोटाळा ईडीने सदानंद कदम याना ताब्यात घेतले आहे. अब तेरा क्या होगा अनिल परब असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर करून सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ईडीने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिला नाही. मात्र, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सदानंद कदम हे होळी निमित्त गावाला गेलेलं असताना ईडीने त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने शुक्रवारी पहाटे खेडमधील ईडूशी गावातून कारवाई करून सदानंद कदम यांना ताब्यात घेतले आहे. कदम याना मुंबईला चौकशीसाठी घेण्यात येऊन येत असल्याचे सांगण्यात येत आहे. सदानंद कदम हे उद्योजक असून माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू आहेत.
हे ही वाचा:
समृद्धी महामार्गावरून शक्तिपीठ महामार्गाकडे
किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर पुन्हा उद्धव ठाकरेंचे ‘पार्टनर’
दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने या आधीही सदानंद कदम यांची चौकशी केली होती. त्यावेळी त्यांनी या चौकशीला आव्हान दिले होते आपण जमीन खरेदी केली होती आणि केबल व्यवसायातून मिळालेल्या पैशाचा वापर करून रिसॉर्ट बांधले होते असा दावा केला होता. पण ईडीला या खरेदी प्रकरणात संशय आहे. त्यामुळे आता कदम यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. सदानंद कदम यांची मुंबई ईडी कार्यालयात कसून चौकशी करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.