राज्यसभा निवडणुकीचा रणसंग्राम संपल्यानंतर आता येत्या २० जुलैला महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडत आहेत. दरम्यान राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू आहेत. विधान परिषदेसाठी भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून अर्ज दाखल झालेल्या सदाभाऊ खोत यांनी अचानक आज अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे आता भाजपाकडून पाच उमेदवार रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून सहा उमेदवार रिंगणात आहेत.
दरम्यान, सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याने आम्ही पाच जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा होती, पण काँग्रेसने दुसरा उमेदवार माघार न घेतल्याने निवडणूक होत आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आमची पाचवी जागा निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सहावी जागा लढणे शक्य नसल्याने सदाभाऊंचा अर्ज माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
… आणि जवानांनी पर्यटकांची केली सुटका
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात स्फोट; एकाला घेतलं ताब्यात
मूसेवाला हत्येप्रकरणी संतोष जाधवच्या आवळल्या मुसक्या
मुलांवर आंदोलनांचे हे कसले ‘संस्कार’
भाजपने पाच जागांसाठी सहा उमेदवरा रिंगणात उतरवले होते. भाजपच्या पाच जागा पक्ष लढवणार आहेच. मात्र सदाभाऊ खोत यांना अपक्ष म्हणून उतरवून भाजपाने महाविकास आघाडी सरकारच्या विधानपरिषदेच्या अडचणी वाढवल्या होत्या.
विधानपरिषदेच्या दहा जागांसाठीचे उमेदवार
भाजपा- प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड
शिवसेना- सचिन अहिर, आमशा पाडवी
राष्ट्रवादी काँग्रेस- रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे
काँग्रेस- भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे