सदाभाऊ खोतांना मानखुर्द जवळ रोखले

सदाभाऊ खोतांना मानखुर्द जवळ रोखले

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या म्हणून बेमुदत संपाची हाक दिली आहे. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या पण एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलनीकरण व्हावे या प्रमुख मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलन चिघळत आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रालय इथे होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून एसटी कर्मचारी दाखल होत आहेत.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांना मानखुर्द चेकपोस्ट इथे अडवण्यात आले. आज मंत्रालयासमोर मोर्चा काढण्यास कुठलीही परवानगी नसल्यामुळे त्यांना मानखुर्द येथेच अडवले आहे. पोलीस बंदोबस्त लावून कर्मचाऱ्यांना अडवले जात असल्याने सदाभाऊ खोत यांनी रस्त्यावर बसून निषेध केला. तसेच अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. त्यामुळेच पगार आणि विविध मागण्यांसाठी राज्यभरात सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात चार जण अटकेत

नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? हर्षदा रेडकर यांची पोलीस तक्रार

९६ देश टोचणार कोव्हीशिल्ड, कोव्हॅक्सिन

वरळी कोळीवाडा डेपो बंद; प्रवासी संभ्रमात

आंदोलन चिघळवण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. आझाद मैदानात शांततेत कामगार येतील असे सांगितले होते. पण तरीही कामगारांना अडवण्यात आले आहे. जवळपास ५० हजार कामगार रस्त्यावर उतरले आहेत. राज्याचे धुरंधर नेते शरद पवार, अनिल परब आणि गृहमंत्र्यांची बैठक झाली आणि त्यात आंदोलन मोडून काढण्याचा निर्णय़ झाला. तुम्ही ड्रग्ज प्रकरणी बैठक घेताय पण तुम्हाला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र बंद ठेवला होता, मग आता कर्मचाऱ्यांसाठी काहीच नाही का असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्यामुळे मी अन्नत्याग आंदोलन करत आहे, असे खोत म्हणाले.

सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कारवाई करण्यास सुरुवात कली आहे. संपावर गेलेल्या सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना महामंडळाने काल निलंबित केले आहे. कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला नसल्याने सरकारही कठोर झाल्याचे दिसते आहे. न्यायालयाचा संप न करण्याचा आदेश धुडकावून लावत कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवल्याने, कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिकाही सरकारकडून दाखल करण्यात आली आहे. आज त्यावर कोर्टातही सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version