उद्धव ठाकरे बकरा, शरद पवार कसाई! सदाभाऊंचा सणसणीत टोला

उद्धव ठाकरे बकरा, शरद पवार कसाई! सदाभाऊंचा सणसणीत टोला

राज्यातील शेतकरी नेते, माजी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सणसणीत टोला लगावला आहे. इच्छा नसताना उद्धव ठाकरेंना आपण मुख्यमंत्री बनण्याचा आग्रह केला. या शरद पवारांच्या विधानावरून सदाभाऊ खोत यांनी हल्ला चढवला आहे.

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील विरोधी पक्षांचे नेते यांच्यात कायमच शाब्दिक कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो. या शाब्दिक टोलवाटोलवीचा ताजा अंक नुकताच राज्याची जनता अनुभवत आहे.

शुक्रवारी पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा विरोधात फटकेबाजी केली. तर शनिवारी त्यांच्या या भाषणाची विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चिरफाड करून टाकली. शुक्रवारी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी असे म्हटले की “मला सत्तेची लालसा नाही. मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते.” तर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत याचीच री पुढे ओढताना “मुख्यमंत्री होण्याची त्यांना इच्छा नव्हती. मी त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा आग्रह केला.” असे सांगितले.

हे ही वाचा:

काँग्रेस नेता म्हणाला, इस्लामिक अजेंडा राबवला जातोय!

भारतातील बैठकीसाठी पाकिस्तानलाही दिले निमंत्रण

बंगालमध्ये दुर्गा विसर्जनाच्यावेळी गेलेल्या भाविकांवर बॉम्ब हल्ला!

‘काँग्रेस पक्षाची अवस्था ही सर्कससारखी झाली आहे’

पवारांच्या याच विधानावरून सदाभाऊ खोत यांनी पवारांना सणसणीत टोला लगावला आहे. ‘बकऱ्याला कापायचं की जगू द्यायचं हे बकरा नसतो ठरवत, तो निर्णय कसायाचाच असतोय’ असे ट्विट सदाभाऊ खोत यांनी केले आहे. ये ट्विटमधूध त्यांनी उद्धव ठाकरे यांना हलाल होणाऱ्या बकऱ्याची उपमा दिली आहे, तर शरद पवार यांना कसाई म्हटले आहे.” सदाभाऊ यांच्या या नव्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात काय नवीन शाब्दिक चकमकी पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version