27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारण‘शरद पवारांचं आडनाव बदलून आगलावे ठेवा’

‘शरद पवारांचं आडनाव बदलून आगलावे ठेवा’

Google News Follow

Related

राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा वाद राजकीय वर्तुळात पेटलेला असताना आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत यांनी उडी घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. सदाभाऊ खोत हे सोलापूरमध्ये बोलत असताना त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

“शरद पवार हे महान नेते आहेत. मात्र, त्यांनी राज्यामध्ये काड्या करण्याशिवाय काहीही काम केलेलं नाही. जाईल तिथे आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे, असे काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांचे आडनाव बदलून आगलावे ठेवावे,” अशी घाणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या या टीकेनंतर मात्र राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

“येड्यांच्याच मागे ईडी लागल्याची राज्यात स्थिती आहे. जे सज्जन आहेत त्यांना काहीही त्रास नाही. ईडीच्या धाडी या शहाण्या-सज्जनांच्या घरी पडत नाहीत. शेतकऱ्यांकडे वीज बिल मागाल तर दांडक्याने सोलून काढू. तुम्हाला आता संपूर्ण वीजबिल माफ करावं लागेल,” असा इशाराही सदाभाऊ खोतांनी दिला आहे.

हे ही वाचा:

कोरोना काळात विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार

‘हिंदू सणांना परवानगी देताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा मारतो का?’

नुकतेच लग्न झालेल्या कबड्डीपटूचा खून

एक एक रुपया जमा करून त्याने घेतली ड्रीम बाईक

सदाभाऊ खोत यांनी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडच्या सापडलेल्या डायरीचाही उल्लेख केला. “आईला काही उपहार दिलं असेल तर ते आम्ही डायरीत लिहून ठेवत नाही. आईचे अनंत उपकार असतात. त्यामुळे आईला काही दिलं तर ते डायरीत कोणी लिहून ठेवत नाही असे,” सदाभाऊ खोत म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा