विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी ईव्हीएमविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. सोलापूरमधील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव सध्या चर्चेत आले आहे. दरम्यान, भाजपाने याच मारकडवाडीत ईव्हीएमच्या समर्थनात मोठी सभा आयोजित केली. नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर, रयंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत मारकडवाडीत ही सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना सदाभाऊ खोत यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे मारकडवाडीला जाणार असल्याची चर्चा चालू आहे. यावरून सदाभाऊ खोत यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. सदाभाऊ खोत म्हणाले की, “इंडियातला सर्वात मोठा चोर मारकडवाडीत येणार आहे. राहुल बाबा मारकडवाडीत येणार असल्याचं ऐकलं. परंतु, माझं गावकऱ्यांना आवाहन आहे तुम्ही इथे एक फलक लावून ठेवा. त्यांना विचारा, काट्याकुट्यातून तुडवित रस्ता, कसा गावकडं आलास बाबा? राहुल गांधी अमेरिकेला जातात, जपान- रशियाला जातात. परंतु, त्यांना माहिती नाही की या इंडियात एक भारत सुद्धा आहे. या भारतात दगडमातीची घरं आहेत. आम्ही तुमचं या गावात स्वागत करू. हवं तर आमचा हा मंडप असाच तुमच्यासाठी ठेवू. तुम्ही मागितलात तर भटजीसुद्धा ठेवू. कारण गावाकडील मंगलाष्टका जरा ऐका. कारण राहुल बाबाचं एकच स्वप्न आहे. मेरी शादी कब होगी? जब मैं पंतप्रधान बनूंगा तब मेरी शादी होगी,” अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
शरद पवारांबाबत बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, “शरद पवार खूप हुशार आहेत. सध्या त्यांना झोप लागत नाही. ६०-७० वर्षे सत्ता भोगली. आता पहिल्यांदा यांचा बाप देवाभाऊ आला आहे. देवाभाऊचा नावाचा वस्ताद या मातीत आला. लोकशाही वाचवण्याचे काम या गावाने केले. शरद पवार यांचा पक्ष नसून गुंड आणि लुटारुंची टोळी आहे आणि ते गाडायचे काम देवाभाऊने केले,” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
हे ही वाचा :
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच, मशीद नाही
वक्फ बोर्डचा मनमानी कारभार, देशातील ९९४ मालमत्ता गिळल्या!
कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर ‘या’ बेस्ट बसेसचा मार्ग बदलला
कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
“बॅलेट पेपरमध्ये घोटाळा करता येतो हे त्यांना लक्षत आले. हातात संविधान घेता आणि कायदा मोडता. २००४ मध्ये काँग्रेसने ईव्हीएम मशीन आणली. १० वर्षे त्यांनी सत्ता भोगली. त्यावेळी मशीन चांगली होती, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली.