मुंबईतील आझाद मैदानावर सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे संपाचे स्वरूप दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. काल (२१ नोव्हेंबर) सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावरून बोलताना संपाला आता १२ दिवस झाले असून आता सरकारचे तेरावे घालणार, नंतर चौदावे घालणार आणि नंतर परिवहन मंत्र्यांच्या घराबाहेर कर्मचारी जाऊन आंदोलन करणार असल्याचे म्हटले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज आझाद मैदानावर सरकारचे तेरावे घालण्याचे विधी सुरू आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आता १२ दिवस पूर्ण झाले असून आज तेरावा दिवस आहे. आझाद मैदानावर तेराव्याच्या सर्व विधी सुरू असून या विधीमध्ये सर्व एसटी कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. दरम्यान आज परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये भेट झाली असून या गुप्त बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप हाच प्रमुख विषय असण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर संपाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
पुलवामा हल्ल्यात वापरण्यात आलेल्या रसायनाची अॅमेझॉनवरून खरेदी
अनिल परब-शरद पवार वरळीत भेटले!
अभिनंदन! अभिनंदनचा वीर चक्रने सन्मान
शिवसेना जिल्हाप्रमुखाला ‘गुटखा’ पडला महागात
आझाद मैदानावरून सदाभाऊ खोत हे ‘टीव्ही ९’शी बोलताना संपाबाबत आणि गुप्त बैठकीविषयी बोलताना म्हणाले की, चर्चा तर होत असतात. मात्र, यातून चांगला तोडगा निघावा अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले. या सर्वाचा फटका कर्मचाऱ्यांना बसतो, सरकारला दया येत नाही निलंबनाची कारवाई केली जाते, असेही सदाभाऊ खोत म्हणाले. कर्मचाऱ्यांना त्यांच्या घामाचा मोबदला मिळायला हवा, त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य हवे, असे सदाभाऊ खोत म्हणाले.