‘महाविकास आघाडीचा अजब कारभार हर्बल गांजा वढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा’

‘महाविकास आघाडीचा अजब कारभार हर्बल गांजा वढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा’

महाराष्ट्रमध्ये ठाकरे सरकारने दारूवरील ५० टक्के कर कमी केला आहे. महाविकास आघाडी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेताना परदेशातून आयात होणाऱ्या दारूवरील करामध्ये कपात केली आहे. यामुळे परदेशातून महाराष्ट्रात येणारी दारू स्वस्त होणार आहे. यावरूनच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

सदाभाऊ खोत यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. ‘महाविकास आघाडी सरकारचा अजब कारभार हर्बल गांजा वढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा,’ असा टोला सदाभाऊ खोत यांनी सरकारला लगावला आहे. तसेच ‘एक्साईज ड्युटी कमी करून आता सरकारने दारू पिण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचे काम हातात घेतले आहे,’ असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

गुरुवारी (१८ नोव्हेंबर) या संदर्भातले परिपत्रक महाराष्ट्र सरकारतर्फे काढण्यात आले. त्यानुसार राज्याला परदेशातून आयात होणाऱ्या स्कॉचच्या विक्रीतून शंभर कोटींचा महसूल मिळतो. पण या दारूची किंमत कमी झाली तर विक्री वाढून हा महसूल अडीचशे कोटी पर्यंत वाढू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या एक लाख बाटल्या परदेशी स्कॉचच्या महाराष्ट्रात विकल्या जात असून ही विक्री अडीच लाखांपर्यंत वाढण्याचा अंदाज सरकार मार्फत वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या दारू विक्रीला चालना देण्यासाठी सरकारकडून एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीस दंगलग्रस्त अमरावतीच्या दौऱ्यावर

अमेरिकेत राष्ट्रपती पदाची सूत्रे उपराष्ट्रपतींकडे सोपवू शकतात मग महाराष्ट्रात का नाही?

स्वदेशी आयएनएस विशाखापट्टणम नौदलात दाखल!

मानखुर्द रेल्वे स्थानकात हत्या, निष्काळजीपणामुळे आरपीएफ जवान निलंबित

या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून विरोधी पक्षाने सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. भाजपने ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधताना ‘हजार कोटींच्या वसुलीसाठी सरकारचा खटाटोप चालला आहे’ असे म्हटले आहे.

Exit mobile version