परब, पवार साहेब, गरिबांच्या चुलीत पाणी टाकू नका!

परब, पवार साहेब, गरिबांच्या चुलीत पाणी टाकू नका!

सदाभाऊ खोत यांनी केला हल्लाबोल

राज्य सरकार म्हणते की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकावली. मी सरकारला सांगतो की, आम्हाला तशी गरज नाही. आम्ही चुलीत पाणी ओतलं नाही. चुली पेटविण्याचं काम गोपीचंद आणि मी केलं. अनिल परब, पवारसाहेबांना सांगतो. तुम्ही गरिबांच्या चुलीत पाणी ओतू नका, तुम्हाला शाप लागेल शाप, अशा शब्दांत भाजपा नेते सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सरकारवर हल्लाबोल केला.

एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानातील आंदोलन आता आणखी तीव्र होऊ लागले आहे. एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाची मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या कर्मचाऱ्यांना

संबोधित करताना सदाभाऊ खोत यांनी सरकारला अनेक प्रश्न विचारले. एसटी कर्मचाऱ्यांनीही घोषणांचा पाऊस पाडत सरकारचा निषेध केला. ठाकरे सरकार हाय हाय, ठाकरे सरकार हाय हाय

जाणता राजा हाय हाय, कोण म्हणतं देत नाय, घेतल्याशिवाय जात नाही, एकच छंद गोपीचंद एकच भाऊ सदाभाऊ अशा घोषणांनी आझाद मैदान दुमदुमले.

खोत म्हणाले की, तरणीबांड पोरं आत्महत्या करत आहेत. ही लालपरी आम्हाला वाचवायची आहे. आज आपल्याला हा लढा निकराने पुढे न्यायचा आहे. मी सांगतो की, हा सदाभाऊ किंवा पडळकरसाठी लढा नाही तुम्हाला न्याय मिळावा आम्ही इथे उभे राहिलो. तुमचा स्वाभिमान आम्ही विकणार नाही. माणसं खाणारा सैतान परिवहन मंत्री या महाराष्ट्राने कधीही बघितला नाही.

 

हे ही वाचा:

देशातील घटनेवर बोलणारे, राज्यातील घटनेबाबत गप्प का?

‘तू माझा मुलगा आहेस हे सांगताना अभिमान वाटतो’! ‘बिग बी’ नी केले अभिषेकचे कौतुक

राज्यातील तळीरामांना ठाकरे सरकारचे गिफ्ट! स्कॉचवरील एक्साईज ड्युटीमध्ये कपात

३९ हजार झाडांची कत्तल करण्याची कशी दिली परवानगी? आदित्य ठाकरेंना सवाल

 

खोत म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारला सांगितले एसटीचे विलिनीकरण कसे करता येईल, पैसे कसे बजेटमधून देता येतील. तुम्ही बजेटमधून तरतूद करा, निर्णय घेतल्यावर मी स्वागत करेन असेही ते म्हणाले. पण कामगार संघटनांना वाटते आहे की, विलिनीकरण झाले तर आपले दुकान कुठे टाकायचे.

Exit mobile version