सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या उद्घाटनावरून राज्यात आता वातावरण तापल्याचे चित्र आहे. या स्मारकाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होऊ नये यासाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. सांगली जिल्ह्याशी काही संबंध नसताना शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन नको. इतर स्थानिक नेत्यांची नावे वगळण्यात आल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. तसेच आतापर्यंत तुम्ही किती उद्घाटन केली, कंटाळा आला नाही का? असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना लगावला आहे.
हे ही वाचा:
विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला ‘नो’ एन्ट्री
राष्ट्रवादीचे मंत्री विरुद्ध काँग्रेसचे आमदार! ट्विटरवर जुंपली
‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ
‘२४ महिन्यांत ३८ मालमत्ता! मुंबईला ते कसं लुटतात हे उघड झालं’
आम्ही आता सिक्सच मारणार आणि उद्घाटन करणार, कितीही पोलीस बळाचा वापर केला तरी उद्घाटन होणारच अशी ठाम भूमिका गोपीचंद पडळकर यांनी घेतली होती. आम्ही लोकार्पणासाठी परवानगी मागितली पण ती दिली नाही. ड्रोनद्वारे आहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकावर पुष्पवृष्टी करण्यात आली. आमच्या दृष्टीने स्मारकाचे लोकार्पण झाले, असे पडळकर म्हणाले. समान्य लोकांच्या हस्ते लोकार्पण झाले. मेंढपाळाच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण झाले, असेही ते म्हणाले. पापी लोकांच्या हस्ते उद्घाटन झालं नाही याचे समाधान झाले, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.