सचिन वाझे अनिल देशमुखांविरुद्ध साक्ष देणार; ईडीला लिहिले पत्र

सचिन वाझे अनिल देशमुखांविरुद्ध साक्ष देणार; ईडीला लिहिले पत्र

मनी लाँड्रिंग प्रकरणात सचिन वाझे यांनी ईडीला पत्र लिहित माफीचा साक्षीदार बनण्यास तयार असल्याचे पत्र लिहिले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांच्याविरोधात सरकारी साक्षीदार बनण्यास आपण तयार असल्याचे सचिन वाझे यांनी लेखी पत्रात म्हटले आहे. सचिन वाझेंच्या या अर्जासंदर्भात ईडी १४ फेब्रुवारीला कोर्टात आपली भूमिका मांडणार आहे.

सचिन वाझे यांनी या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक संचालक तसीन सुलतान यांना पत्र लिहून अनिल देशमुख व इतरांविरुद्ध न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर साक्ष देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात वाझे यांच्यावरही आरोप करण्यात आले असून, ईडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात दोनदा त्यांचा जबाब नोंदवला आहे. सचिन वाझे यांनी हे पत्र ४ फेब्रुवारी रोजी लिहिले असून तळोजा कारागृहातून पोस्टाने पाठवण्यात आले होते.

हे ही वाचा:

मुंबई विद्यापीठाच्या निर्णयावर मंगेशकर कुटुंबीय नाराज

बेरोजगारी, कर्जबाजारीमुळे तीन वर्षात २५ हजार आत्महत्या

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना समन्स

कर्णधार रोहित शर्माच्या डावपेचांसमोर वेस्ट इंडिज संघ क्लिन बोल्ड

सचिन वाझे यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात अनिल देशमुख यांनी बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे घेण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. अनिल देशमुख आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी मुंबई पोलिसांच्या १० डीसीपींच्या बदल्या रद्द करण्यासाठी प्रत्येकी २० कोटी रुपये घेतल्याचा आरोपही सचिन वाझे यांनी केला होता. यापूर्वी सचिन वाझे यांनी आयोगासमोर कोणतीही भूमिका घेण्यास नकार दिला होता. बुधवारी त्यांनी प्रतिज्ञापत्रात अनिल देशमुख यांच्यावर साथीदारांना पैसे दिल्याचा आरोप केला आहे.

Exit mobile version