शंभर कोटी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाला आहे. मंगळवार,७ जून रोजी म्हणजेच आज सचिन वाझेला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याने माफीच्या साक्षीदार अर्जावर न्यायालयासमोर स्वाक्षरी केली आहे. न्यायाधीश डी.पी. शिंगाडे यांनी अटी व शर्तीवर सचिन वाझेला माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता दिली आहे.
वाझे माफीचा साक्षीदार झाल्याने अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २० जूनला होणार, असे जाहीर केले आहे. सचिन वाझेने केलेली माफीचा साक्षीदार होण्याची विनंती मुंबई सत्र न्यायालयातील मान्य करताच, सीबीआयने २४ तासाच्या आतच आरोपपत्र दाखल केले आहे. याआधी वाझेला सीबीआयच्या विशेष न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे हजर करण्यात आले होते. त्यावेळी सचिन वाझेला माफीचा साक्षीदार म्हणून घोषित करण्यात आले होते.
हे ही वाचा:
आता रेल्वेत महिन्याला होणार २४ तिकिटांचे बुकिंग
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जमीन केंद्राचीच!
जीवे मारण्याच्या धमकीनंतर नुपूर शर्मा यांना दिल्ली पोलिसांकडून सुरक्षा
आत्मनिर्भर भारतासाठी ७६,३९० कोटींच्या संरक्षणविषयक सामग्रीच्या खरेदी प्रस्तावांना मान्यता
दरम्यान, सचिन वाझेने या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक संचालक तसीन सुलतान यांना पत्र लिहून अनिल देशमुख व इतरांविरुद्ध न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर साक्ष देण्यास तयार असल्याचे सांगितले होते. या प्रकरणात वाझे यांच्यावरही आरोप करण्यात आले असून, ईडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात दोनदा त्यांचा जबाब नोंदवला होता. अनिल देशमुख हे गृहमंत्रीपदावर असताना भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.