१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत आहे. यामध्ये आता बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी अनिल देशमुख यांच्या विरोधात साक्ष देण्याची तयारी दाखविली आहे. सीबीआयने सचिन वाझेंचा माफीचा अर्ज स्वीकारला आहे. सचिन वाझेंना माफीचा साक्षीदार होण्यासाठी सर्व तरतुदी तसेच कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.
न्यायालयाने सचिन वाझेंची याचिका स्वीकारल्यानंतर त्यांची साक्ष फिर्यादी साक्षीदार म्हणून नोंदवली जाणार आहे. तसेच पुरावे इतर आरोपींविरुद्ध वापरले जाऊ शकतात. माफीच्या साक्षीदारानंतर सचिन वाझेंना खटल्याला सामोरं जावे लागणार नाही.
सचिन वाझेंनी दुसऱ्यांदा न्यायालयात माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला होता. त्यांनतर त्यांचा अर्ज सीबीआयने स्वीकारला आहे. त्यामुळे वाझेंना अनिल देशमुखांविरोधात साक्ष द्यावी लागणार आहे. ३० मेपर्यंत वाझेंना त्यांची उत्तरे एनआयए, सीबीआय आणि ईडीला द्यावी लागणार आहेत.
हे ही वाचा:
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर! २० जूनला होणार मतदान
अमेरिकेच्या कानशिलावर ‘बंदूक’!
यशवंत जाधवांना ईडी पुन्हा समन्स पाठवणार?
मोदी सरकारच्या काळात डिजिटल पेमेंटमध्ये भारत नंबर वन
सचिन वाझे यांच्यावर मनी लाँड्रिंग अर्थात आर्थिक अफरातफर आणि खंडणी वसुली करणे तसेच मनसुख हिरेन याच्या हत्येच्या प्रकरणात हात असल्याचा आरोप आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचाही आरोप वाझेंवर आहे. या प्रकरणात केंद्रीय यंत्रणांनी सखोल चौकशी सुरू केली. सखोल चौकशीतूनच पुढे अनिल देशमुख अडचणीत सापडले होते.