अजित पवारांवरही सचिन वाझेकडून आरोपांच्या फैरी

अजित पवारांवरही सचिन वाझेकडून आरोपांच्या फैरी

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचे एक कथित पत्र मीडिया आणि सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहे. या पत्रात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही नाव पुढे आले आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नाव तर आधीपासूनच या प्रकरणात होते पण आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव आल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख आणि अजित पवार यांच्यासोबतच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचेही नाव सचिन वाझे याने घेतले आहे. एनआयए कडून न्यायालयात हे पत्र सादर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या या दोन्ही प्रकरणात प्रमुख आरोपी असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याची सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी केली जात आहे. बुधवारी वाझे याचे एक कथित पत्र समोर आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाला उद्देशून वाझेने हे पत्र लिहिले आहे. या पत्रात वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लाच मागितल्याचे आरोप केले आहेतच शिवाय आता या पत्रामधून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही नाव समोर आले आहे. या पत्रात उपमुखमंत्री अजित पवार यांच्याविषयी सचिन वाझेने गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाला सचिन वाझे?

सचिन वाझे आपल्या पत्रात म्हणतो, “नोव्हेंबर २०२० मध्ये ‘दर्शन घोडावत’ नावाच्या माणसाने माझ्याशी संपर्क केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून दर्शन घोडावत याने स्वतःची ओळख करून दिली. घोडावत याने महाराष्ट्राच्या अखत्यारीत होणाऱ्या बेकायदेशीर गुटखा आणि तंबाखू व्यापाराबद्दल माहिती दिली तसेच या विषयीचे विशेष तपशीलही दिले. घोडावत याने या बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांकडून दर महिना १०० करोड गोळा कारणासाठी आग्रह धरला. पण मी हे बेकायदेशीर कृत्य करण्यास असमर्थ आहे असे त्याला ( घोडावत ) सांगितले. माझा या गोष्टीला असलेला विरोध पाहून माझी पोलीस खात्यातील नोकरी जाईल अशी धमकी त्याने मला दिली. २०२१ च्या सुरवातीपासूनच मुंबईमध्ये असलेल्या बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांवर मी कारवाई करायला सुरवात केली आणि करोडो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आणि यामध्ये गुटखा फॅक्टरी आणि फॅक्टरी मालकांवर कारवाई करण्यात आली. पण या कारवाई नंतर माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाराजी दर्शन घोडावत याने माझ्या ऑफिसमध्ये येऊन जाहीर केली.

हे ही वाचा:

नक्षली हल्ल्यातूनही विरोधकांचा ‘फेक न्यूज’चा प्रयत्न

अनिल देशमुखांनी नियुक्तीसाठी मागितले २ कोटी, वाझेच्या कथित पत्रात गौप्य्स्फोट

अयोध्येतील रस्त्याला कोठारी बंधूंचे नाव

मुंबईत चालू होणार जल वाहतूक

ज्या गुटखा उत्पादकांवर कारवाई करण्यात आली त्यांनी त्याला (घोडावत) किंवा थेट उपमुखमंत्र्यांना येऊन भेटावे असे मला घोडावत याच्याकडून सांगण्यात आले पण मी असे कोणतेही कृत्य करण्यास नकार दिला.” माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर वाझेच्या माध्यमातून १०० कोटीची खंडणी वसूल करत असल्याचा लेटर बॉम्ब टाकल्यानंतर देशमुख अडचणीत आले. त्यांचे गृहमंत्री पदही गेले. त्यात आता वाझे यांच्या या नव्या पत्राने देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहेच शिवाय उपमुखमंत्री अजित पवार यांचे नाव आल्यामुळे ही केस कोणत्या दिशेला वळणार आणि अनिल देशमुखांसारखंच अजित पवारांच्या अडचणी वाढणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version