निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाझे सध्या मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात आहे.
गोरेगावमधील एका वसुली प्रकरणात सचिन वाझेला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले होते. वाझेचा ताबा मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याची कोठडी संपल्याने त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं असता त्याच्या कोठडीत १३ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलीया’ या घराबाहेर जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. सुरवातीचा आठवडा या प्रकरणात सचिन वाझे हे तपास अधिकारी म्हणून काम करत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला होता. यावेळी फडणवीस यांनी वाझेंबद्दल संशय व्यक्त केला होता. “जिलेटीनने भरलेल्या गाडीची माहिती जेव्हा मिळाली तेव्हा स्थानिक पोलिसांच्या आधी वाझे तिथे पोहोचलेले होते. हिजबुल मुजाहुद्दीनच्या धमकीचे खोटे पत्रही वाझेंनाच सापडले होते. स्कॉप्रिओचे मालक असलेले मनसुख हिरेन हे वाझे यांच्या आधीपासूनच संपर्कात होते.” असा दावा फडणवीस यांनी विधानसभेत केला आणि त्याबाबतचे पुरावे देखील दिले.
हे ही वाचा:
अहमदनगरमध्ये रुग्णालयात आग लागून १० जणांचा मृत्यू
कच्च्या तेलापाठोपाठ आता खाद्य तेलही झाले स्वस्त
आर्यन खानची केस थेट दिल्ली एनसीबीकडे
उत्तरप्रदेश, हरियाणानंतर मध्यप्रदेशात येणार ‘हा’ कायदा
दरम्यान, सचिन वाझे हा तळोजा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होता. पण सचिन वाझे याच्या छातीत दुखू लागल्यामुळे १५ ते २० दिवसापासून त्याच्यावर मुंबईतील जे.जे रुग्णालयात उपचार सुरू होते. सचिन वाझे याच्या रक्तवाहिनीत ३ मोठे ब्लॉक आढळून आले होते. त्यामुळेच त्याला शस्त्रक्रियेची गरज असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले होते. वाझेच्या वकिलांनी हा दावा न्यायालयात केल्यानंतर न्यायालयाने वाझेला रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली.