अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे यांचे निलंबन करण्यात आले आहे.
शनिवारी तेरा तासांच्या चौकशी नंतर सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली होती. त्यांना काल न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी सचिन वाझे यांना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली. न्यायमूर्ती शिंकरे यांच्या न्यायलयाने हा निर्णय दिला आहे. आता सचिन वाझे यांना निलंबीत करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
इनोव्हा मधून पीपीई किट घालून उतरलेल्या व्यक्तीचे गुढ उलगडले?
मराठा आरक्षणावर सुनावणीला सुरूवात
नाणारला तळा अथवा जयगडचा पर्याय
अंबानींच्या घराबाहेर सापडललेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीसोबतच एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडीसुद्धा आढळून आली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतही या इनोव्हा गाडीचा उल्लेख केला होता. या इनोव्हा गाडीचा प्रवासही मनसुख हिरेन यांच्या स्कॉर्पिओ गाडीच्याच रस्त्यावरून झाल्याचे फडणवीसांनी म्हटले होते. नंतर या इनोव्हाशी संबंधित सीसीटिव्ही चित्रणही समोर आले होते. शनिवारी रात्री पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे. या गाडीतून पांढऱ्या रंगाचा पीपीई किट घातलेली एक व्यक्ती उतरली होती. ही व्यक्ती म्हणजेच एपीआय सचिन वाझे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची भेट
सचिन वाझे यांच्या अटकेप्रकरणी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली नाही. ‘हा स्थानिक प्रश्न आहे. हे राज्याचे धोरण नाही.’ असे बोलून माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली नव्हती. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. ही भेट सुमारे पाऊण तास चालली. या भेटीदरम्यान सचिन वाझे प्रकरणाची चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत