सचिन वाझे पार्ट-२?

सचिन वाझे पार्ट-२?

मुंबई पोलिसांना दोन जण चौकशी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इमारतीच्या सभोवतालचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहे, मुंबई पोलिसांनी आज सांगितले की घराजवळ स्फोटकांनी भरलेले वाहन सापडल्यानंतर सुरक्षेविषयी प्रचंड भीती निर्माण झाली आहे.

“आम्हाला एका टॅक्सी ड्रायव्हरचा फोन आला की दोन माणसं उर्दूमध्ये मुकेश अंबानींचे निवासस्थान अँटिलिया हे ठिकाण विचारत त्याच्याकडे आले होते.” पोलिसांनी आज मीडियाला सांगितले.

“पत्ता विचारणा-या दोघांच्या हातात एक मोठी बॅग होती, त्यानंतर टॅक्सी चालकाने तत्काळ मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली.” असे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले. चालकाचा जवाब नोंदवला जात असून वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. असे पोलिसांनी सांगितले.

फेब्रुवारी माढिण्यत प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्यानंतर या घराची सुरक्षा मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे. स्कॉर्पिओमध्ये २० जिलेटिनच्या कांड्या आणि मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांना उद्देशून एक पत्र आढळून आले, ज्याचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. ही कार चोरीची असल्याचे आढळून आल्याने नंतर खून झालेल्या व्यक्तीचा शोध लागला.

हे ही वाचा:

भारतातील आर्थिक जाळे जर्मनी, चीनपेक्षा मोठे

देशातील सर्वात मोठ्या IPO आधी मालक थेट तिरुपतीच्या दरबारात

हिंदू पलायन झालेल्या कैरानामध्ये योगी

पंढरपूरला देशातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र बनवू या!

या प्रकरणाच्या तपासात सचिन वाझेचे संबंध असलेल्या कटाचा पर्दाफाश झाला आहे. कार मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी अधिकारी सचिन वाझेला बडतर्फ करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.

तपास हाती घेतलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेला असेही आढळून आले की सचिन वाझे याने स्फोटके आणली होती आणि मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एसयूव्ही पार्क केली होती.

Exit mobile version