28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामासचिन वाझे ७ एप्रिलपर्यंत एनआयएच्याच ताब्यात

सचिन वाझे ७ एप्रिलपर्यंत एनआयएच्याच ताब्यात

Google News Follow

Related

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या एपीआय सचिन वाझेला ७ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. आज पोलिस कोठडी संपल्यानंतर सचिन वाझे एनआयए कोर्टापुढे हजर झाला. सचिन वाझेला हृदय रोगाचा आजार असल्याचं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं. रविवारी स्ट्रोक आल्याची माहिती कोर्टाला त्याने दिली. यावर वाझेला योग्य ते उपचार मिळत आहेत, असा दावा एनआयएनं केला. ताब्यात घेतल्यापासून दोनदा २डी इको, ब्लड टेस्ट करण्यात आल्याची माहिती कोर्टाला एनआयएनं दिली. त्यावर  केवळ २डी इको पुरेसं नाही, अँजिओग्राफीची गरज असल्याचा दावा वाझेच्या वकिलांनी केला.

एनआयएनं वाझेची ६ दिवस कोठडी वाढवून मागितली. एनआयएच्या वतीने एएसजी अनिल सिंह यांनी युक्तीवाद केला. मिठी नदीतून कंप्युटर, लॅपटॉप, हार्डडिस्क इ. साहित्य हाती लागलं. डिसीबी बँक वर्सोवा शाखेत एका व्यक्तीसोबत वाझेंचं जॉईंट अकाऊंट आहे. सोबत एक लॉकरही आहे. वाझेंची अटक होताच त्या अकाऊंटमधले २६ लाख रूपये काढण्यात आले. आता त्यात केवळ ५ हजार शिल्लक आहे. लॉकरही ऑपरेट झाला, त्यात आता केवळ काही बिनकामाची कागदपत्र ठेवलेली आहेत. एका अनोळखी व्यक्तीचा पासपोर्टही वाझेच्या घरी सापडला आहे.कुणी आपला ओरिजनल पोसपोर्ट दुसऱ्याकडे देतो का?, त्यामुळे त्यादृष्टीनंही तपास होणं आवश्यक आहे, असा एनआयएच्या वतीनं विशेष कोर्टात युक्तिवाद करण्यात आला.

हे ही वाचा:

ओपेककडून जगाला तेल दिलासा

सचिन वाझेशी संबंधित आणखीन एक गाडी एनआयएच्या ताब्यात

मुंबईत लॉकडाऊन लावावाच लागेल-अस्लम शेख

इतका कन्फ्यूज मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिला नाही, मनसेचे सडेतोड

सचिन वाझेच्यावतीने वकील आभात पोंडा यांनी युक्तिवाद केला. मिठी नदीत सापडलेलं सारं साहित्य म्हणजे एनआयएचा निव्वळ बनाव आहे. डिसीबी बँकेतील जॉईंट अकाऊंटचा आरोपही वाझेच्यावतीनं नाकारण्यात आला. यावर सचिन वाझेवर लावलेल्या आरोपांशी संबंधित १२० टीबीचं सीसीटिव्ही फुटेज हस्तगत करण्यात आलं आहे, अशी माहिती एनआयएनं दिली. गेल्या काही दिवसांत तो कुठे गेला? कुणाला भेटला? का भेटला? स्फोटकांचं सामन कसं गोळा केलं? मिठी नदीतून सापडेलेल्या गोष्टींतून डेटा रिकव्हर करायचा आहे, असं एनआयएनं कोर्टात सांगितलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा