सुशांतच्या प्रकरणातील गुपितांमुळे वाझेंचा बचाव?

सुशांतच्या प्रकरणातील गुपितांमुळे वाझेंचा बचाव?

भारतीय जनता पार्टीचे आमदार अमित साटम यांनी सचिन वाझे प्रकरणावरून ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. सचिन वाझे यांच्याकडे सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील काही गुपितं आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे.

शनिवारी रात्री उशीरा ११ वाजून ५० मिनिटांनी सचिन वाझे याला राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून (एनआयए) अटक करण्यात आली. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात वाझे यांना अटक करण्यात आली. शनिवारी सकाळी ११ वाजता वाझे हे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या पेडर रोड येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. ही चौकशी तब्बल तेरा तास चालली. तेरा तासांच्या चौकशी नंतर वाझे याला एनआयए कडून अटक करण्यात आली. या अटकेनंतर भाजपा आमदार अमित साटम यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

सचिन वाझे यांना पंचवीस मार्च पर्यंत एनआयए कोठडी

सचिन वाझे कोर्टात हजर

सचिन वाझेंना अडकवणारे अधिकारी कोण?

वाझे प्रकरणातील ते शिवसेना नेते कोण?

काय म्हणाले अमित साटम

“आता हे स्पष्ट होत आहे की, सचिन वाझेंना वाचवण्यासाठी ठाकरे सरकार एवढे प्रयत्न का करत होते. सचिन वाझे यांना सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये काही गुपितं माहिती आहेत का? म्हणूनच त्यांना वाचवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते (सचिन वाझे) लादेन नसल्याचे सांगत आहेत.” असे ट्विट अमित साटम यांनी केले आहे.

Exit mobile version