मनसुख हिरेन प्रकरणात ज्यांच्याभोवती संशयाचे धुके दाटले आहे ते एपीआय वाझे हे सरकारला हलवू पण शकतात आणि घालवू पण शकतात असे खळबळजनक विधान महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना फडणवीसांनी हा घणाघात केला.
ठाकरे सरकारचे नाव लबाड सरकार
ठाकरे सरकारचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात लबाड सरकार असे लिहिले जाईल असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राणा भीमदेवी थाटात जाहीर करायचं की विजतोडणीला स्थगिती दिली आहे. पण अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी स्थगिती उठवायची ही सर्वात मोठी लबाडी आहे. ही स्थगिती उठवायला दिलेली करणे अतिशय चुकीची आहेत. त्या विरोधात आम्ही हक्कभंग आणू असे फडणवीस म्हणाले
हे ही वाचा:
सचिन वाझेचे वकीलपत्र उद्धव ठाकरेंकडे
सचिन वाझेला वकिलाची गरज नाही. कारण ऍड. उद्धव ठाकरे हेच त्यांचे वकील आहेत. ज्यांच्याविरुद्ध एवढे पुरावे आहेत त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एवढे डिफेन्ड करत होते. त्याच्याकडे काय एवढी माहिती आहे? काय जानकारी आहे? काय त्याचा फायदा आहे? की त्याच्या विरोधात एवढे पुरावे येऊनही त्याला मुख्यमंत्र्यांना त्याला डिफेन्ड करावं लागतं. असा प्रश्नांचा भडीमार देवेंद्र फडणवीस यांनी केला
याचवेळी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे हे सरकार हलवूही शकतात आणि घालवूही शकतात असे म्हणत उद्धव ठाकरे सरकारची झोप उडवली आहे.