ॲंटिलिया समोर पुन्हा एकदा दिसला सचिन वाझे!!

ॲंटिलिया समोर पुन्हा एकदा दिसला सचिन वाझे!!

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणाचा एनआयए तपास करत आहे, तर एटीएस मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास करत आहे.

एनआयएने या प्रकरणात गुंतलेल्या पाच गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. यात अंबानींच्या घरासमोर उभी असलेली स्कॉर्पिओ गाडी, एक पांढरी इनोव्हा, दोन मर्सिडिज आणि एक प्रॅडो गाडीचा समावेश आहे. एनआयए कार्यालयात पुण्याहून फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल झाली होती. या सर्व गाड्यांची त्यांच्याकडून तपासणी केली जात होती.

ही फॉरेन्सिक टीम ॲंटिलिया या घटनास्थळी दाखल झाली. ते घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणी उभ्या असलेल्या स्कॉर्पियोचे काही धागेदोरे हाती लागत आहेत का याची तपासणी करत होते. त्याठिकाणी गुन्ह्याचे नाट्यरुपांतर करण्यात आले.

हे ही वाचा:

एनआयएच्या ताब्यातील गाड्यांच्या फॉरेन्सिक तपासणीला सुरूवात

महावितरणाच्या अजब कारभारामुळे पुणे जम्बो कोविड सेंटरमधील बत्ती गुल

एटीएसला मिळणार सचिन वाझेचा ताबा?

वाझे प्रकरणातील प्रॅडोचा मूळ मालक शिवसेनेचाच

या तपासादरम्यान एनआयएचे मुख्य तपास अधिकारी विक्रम खलाटे देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत सचिन वाझे याला देखील आणण्यात आले. त्याच्या सहाय्याने ती स्कॉर्पिओ कुठुन कशी आणली आणि त्याबरोबरच ती कशी पार्क करण्यात आली याबाबतचा तपास केला गेला. त्याला घटनास्थळी चालायला देखील लावण्यात आले. आधी त्याला साध्या कपड्यात चालायला लावण्यात आले. नंतर डोक्यावर रुमाल बांधून आणि सदरा घालून चालायला सांगण्यात आले. सुमारे सात-आठ वेळेला त्यांना चालायला लावण्यात आले. या सर्व प्रकरणाचे चित्रीकरण देखील करण्यात आले. त्या नंतर त्यांना पुन्हा एकदा घटनास्थळावरून नेण्यात आले.

प्रत्यक्ष घटना घडली त्यादिवशी सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती पीपीई किट घातलेली एक व्यक्ती चालताना दिसत होती. त्यामुळे सचिन वाझे याची चालण्याची लकब, शैली याच्या पडताळणीमार्फत ही व्यक्ती वाझेच आहे किंवा नाही याबाबत निश्चिती करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

यावेळी रस्त्यावरील दुतर्फा वाहतूक बंद करण्यात आली होती. मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Exit mobile version