भारतासाठी मास्टर ब्लास्टरची पुन्हा बॅटिंग!

भारतासाठी मास्टर ब्लास्टरची पुन्हा बॅटिंग!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आपल्या मायदेशासाठी पुन्हा एकदा बॅटिंग करायला मैदानात उतरला आहे. यावेळी मैदान मात्र बावीस यार्डाचे क्रिकेटचे नसून हे मैदान ट्विटरचे आहे. पण या मैदानातही सचिनने भारताच्या बाजूने बॅटिंग करताना विरोधकांची चांगलीस धुलाई केली आहे. 

भारतात सुरु असलेले शेतकरी आंदोलन गेले काही महिने वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत आहे. ३ फेब्रुवारीच्या सकाळी या आंदोलनाच्या समर्थनात काही भारता बाहेरच्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी ट्विट केले आणि सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु झाली. पॉप सिंगर रिहाना, पॉर्न स्टार मिया खलिफा, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थर्नबर्ग यांच्यासोबत अनेकांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केले. पण भारतातील सुरु असलेल्या आंदोलनाचे निमित्त साधून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला बदनाम करायचा डाव भारताने उधळून लावला आहे

या आंतरराष्ट्रीय भारतविरोधी कुरबुऱ्यांचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने चांगलाच समाचार घेतला आहे. मंत्रालयातर्फे एक परिपत्रक काढून या भारत विरोधी मंडळींना चांगलेच फैलावर घेण्यात आले आहे. या नंतर भारतातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी भारताची बाजू लावून धरत ट्विट्सचा भडीमार केला आहे. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही मागे नव्हता. 

“भारताच्या सार्वभौमत्वासोबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारताबहेरच्या शक्ती दर्शक असू शकतात पण सहभागी होऊ शकत नाही.भारतीयांना भारत माहीत आहे आणि भारतासाठीचा निर्णय भारतीयच घेतील. राष्ट्र म्हणून संघटित राहूया.” असे सचिनने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version