काँग्रेसच्या नव्या नियुक्त्यांत पटोले समर्थकांचे ‘लोंढे’; सचिन सावंतांचा नाराजीनामा

काँग्रेसच्या नव्या नियुक्त्यांत पटोले समर्थकांचे ‘लोंढे’; सचिन सावंतांचा नाराजीनामा

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मंगळवारी उलथापालथ झाली आणि नाराजीनाट्य रंगले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अतुल लोंढे यांच्याकडे प्रमुख प्रवक्तेपद सोपविल्यामुळे सचिन सावंत यांनी नाराज होत हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसचे भूमिका आक्रमकपणे मांडण्यासाठी ओळखले जाणारे सचिन सावंत यांच्याजागी लोंढे यांना संधी देण्यात आली आहे. सावंत यांनी आपला राजीनामा हायकमांडला पाठविला असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गटाचे प्राबल्य नव्या नियुक्त्यांमध्ये दिसून येत आहे. अतुल लोंढे हे पटोले समर्थक मानले जातात. माध्यम आणि संवाद विभागाची तसेच मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी लोंढे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. माध्यम समितीत मात्र सचिन सावंत आहेत. वेगवेगळ्या समित्यांची घोषणा बुधवारी करण्यात आली. त्यात अनेक नवे बदल झाले आहेत.

सचिन सावंत हे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत आहेत असेही म्हटले जाते. पण त्या १२ आमदारांना अद्याप राज्यपालांनी हिरवा कंदिल दाखविलेला नाही. त्यात आता सावंत यांना मागे टाकून लोंढे यांना मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

हे हे वाचा:

‘२५ हजार कोटींचे रस्ते कुणाचे? “ठग्स ऑफ बीएमसी”ला कोण वाचवतंय?’

‘आर्यन खानची पाठराखण करणे ही लाजिरवाणी बाब’

उल्हासनगरमध्ये लोक छत्री घेऊन जात आहेत शौचालयात… वाचा काय आहे कारण?

सहकारी साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी

 

एकूणच राष्ट्रीय काँग्रेसमध्ये बऱ्याच उलथापालथी झाल्या आहेत. अनेक निष्ठावानांनी काँग्रेसला रामराम ठोकत इतर राजकीय पक्षांत स्थान मिळविले आहे. नुकतीच पंजाबमधील निष्ठावान नेते कॅप्टन अमरिंदर यांनी राजीनामा देत दुसरा मार्ग पत्करला. तिथे अजूनही नवज्योत सिद्धू आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष सुरूच आहे.

Exit mobile version