ठाकरे गटाचे नेते हे नेहमीचं शिंदे गटातील नेत्यांवर टीका करत असतात. आता मात्र ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी आमदार बच्चू कडू यांचं कौतुक केलं आहे. बच्चू कडू जर सूरत, गुवाहाटीला गेले नसते तर कदाचित दिव्यांगांसाठी झालेले काम हे झाले नसते, असं वक्तव्य सचिन अहिर यांनी केले आहे. अहिर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना सचिन अहिर म्हणाले, मी बच्चू कडू यांचे जाहीर अभिनंदन करतो. खोके मिळाले नाही मिळाले हे मला माहिती नाही. मी त्यामध्ये जाऊ इच्छित नाही. ते माझे चांगले मित्र आहेत. पण या सत्तांतरानंतर किमान त्यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय हवं अशी अनेक वर्षांची त्यांची मागणी होती. त्यांनी ती मागणी मंजूर करून घेतली त्याबद्दल मी या व्यासपीठावर त्यांचे जाहीर कौतुक करतो, असं सचिन अहिर म्हणाले.
बच्चू कडू जर जर सूरत, गुवाहाटीला गेले नसते तर कदाचित हा विभाग झाला नसता असंही अहिर म्हणाले आहेत. अहिर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हे ही वाचा :
‘मन की बात’ कार्यक्रमाचे पुस्तक छापण्यावरून लुबाडले
एका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण
महाराष्ट्रात ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांची पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
तब्बल १५० कोटी ट्विटर युजर्सचे अकाउंट होणार बॅन! जाणून घ्या कारण
शिंदे गटातील आमदारांवर ठाकरे गट सातत्याने टीका करत असतो. गद्दार, खोके सरकार अशा शब्दांत ठाकरे गट नेहमी टीका करत असता. परंतु कडू यांच्या दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय या मागणीमुळे विरोधकही त्यांचे कौतुक करत असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.