27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरदेश दुनियाभारतात ‘सबका साथ’वर शिक्कामोर्तब

भारतात ‘सबका साथ’वर शिक्कामोर्तब

Google News Follow

Related

भारतात अल्पसंख्याकांवर अन्याय होत असल्याची ओरड करणाऱ्या तथाकथित पुरोगामी, डाव्या आणि लिबरल मंडळीना आता अमेरिकेतील पीऊ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानंतर चांगलीच चपराक बसली आहे. या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे की, भारतात सगळ्या धर्मियांना आपापल्या श्रद्धांचे पालन करण्याची पूर्ण मुभा आहे. एकप्रकारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ या संकल्पनेवर या सर्वेक्षणामुळे शिक्कामोर्तबच झाले आहे.

अमेरिकास्थित पिऊ या संस्थेने या संदर्भात प्रत्यक्ष मुलाखती करून हे सर्वेक्षण केले. २०१९च्या अखेरीस ते २०२०च्या प्रारंभीचा काळ या दरम्यान केलेल्या मुलाखतीतून या संस्थेने उपरोक्त निष्कर्ष काढला. जवळपास ३० हजार विविध धर्मीय भारतीयांशी त्यांनी बोलून त्यांची मते जाणून घेतली. त्यात हे स्पष्ट झाले की, भारतात सगळ्यांना आपल्या श्रद्धांचे पालन करण्याची पूर्ण मुभा आहे. त्यात सगळ्यांचे असे म्हणणे होते की, सहिष्णुता हे धार्मिक तसेच नागरी मूल्य आहे. भारतात सगळे लोक इतरांच्या धर्माचा आदर करतात. धार्मिक सहिष्णुता हा केंद्रबिंदू आहे. प्रमुख धार्मिक गटांत हीच भावना असते की इतर धर्माचा आदर केला पाहिजे. तेच राष्ट्रीयत्व आहे.

हे ही वाचा:

विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार?

आरबीआची चार बड्या सहकारी बँकांवर मोठी कारवाई

निर्बंध झुगारत नवी मुंबईत दुकानं उशिरा पर्यंत सुरूच

महिना १०० कोटी खंडणी गोळा करण्याआधी केंद्राला विचारले होते काय?

या मुलाखतींतून असेही समोर येते की, लोक एकमेकांना अलग मानतात. तरीही असे विविध धर्मिय भारतात एकत्र राहतात. हिंदुंना आपण मुस्लिमांपेक्षा वेगळे आहोत असे वाटते आणि तसेच मुस्लिमांनाही हिंदूंपेक्षा आपण वेगळे आहोत असे वाटते. दोन तृतियांश जैन आणि अर्ध्याअधिक शिखांना हे वाटते की, त्यांच्यात आणि हिंदुंमध्ये काही गोष्टी समान आहेत. शिवाय, हिंदूंमध्ये धार्मिक ओळख आणि राष्ट्रीयत्व यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असल्याचे वाटते. हिंदी बोलता येण्याशीही भारतीय असल्याचा संबंध काही हिंदू जोडतात. हिंदी बोलणे आणि हिंदु असणे असेही नाते असल्याचे अनेकांना वाटते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा