मोदींना संपवायला हवे; राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रंधवा यांचे फुत्कार

आता निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून त्यानिमित्त आयोजित सभेत रंधवा यांनी आवाहन केले की,

मोदींना संपवायला हवे; राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रंधवा यांचे फुत्कार

राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुखविंदरसिंग रंधवा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे खळबळ उडाली आहे. सुखविंदर रंधवा यांनी एका भाषणादरम्यान म्हटले होते की, गौतम अदानीपासून भारताचे तेव्हाच संरक्षण होईल, जेव्हा नरेंद्र मोदी हे संपतील.

रंधवा एका प्रचारसभेत बोलत होते. आता निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून त्यानिमित्त आयोजित सभेत रंधवा यांनी आवाहन केले की, जर तुम्ही गौतम अदानींना कंटाळले असाल तर मोदींना पराभूत करा.

हिंडेनबर्गने अदानी उद्योगसमुहावर केलेल्या आरोपांसंदर्भात संसदेत संयुक्त चौकशी समिती बसवावी, अशी मागणी केली जात आहे. त्यानिमित्ताने राजस्थानमध्ये आंदोलन करण्यात आले.

हे ही वाचा:

आजपासून सुरू होणाऱ्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत हरीश साळवे काय बोलणार?

काय अवस्था आली पाहा!! पंजाब पोलिस आता लग्नातही वाजवणार बँड

अजित पवारांचा बुरखा फाटला; म्हणाले होते, जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही…

शीतल म्हात्रे व्हीडिओप्रकरणी साईनाथ दुर्गे अटकेत

रंधवा म्हणाले की, मोदी हे देश उद्ध्वस्त करत आहेत. केंद्रात असलेले भाजपाचे सरकार देश विकत आहेत. त्यामुळे आमचा लढा अदानीशी नाही तर थेट भाजपाशी आहे. प्रत्येकजण अदानीबद्दल बोलत असतो. पण त्याचवेळी मोदींबद्दलही बोलले पाहिजे. अदानींना हटविण्यासाठी मोदी यांना पराभूत केले पाहिजे.

रंधवा यांनी अदानी यांची तुलना इस्ट इंडिया कंपनीशी केली. पंतप्रधान नाही तर अदानी हे देशाचे धोरण ठरवत आहेत.

हिंडेनबर्गने मध्यंतरी अदानी उद्योगसमुहावर आरोप केले होते. अदानी समुहाने ते आरोप फेटाळलेच पण त्यानंतर त्यांचे शेअर्स मात्र मोठ्या प्रमाणात घसरले. याच संदर्भात अनेक विरोधी पक्षांनी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करून त्याअंतर्गत चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

रंधवा यांनी अशीही मागणी केली की, महिलांनी काँग्रेसच्या उद्धारासाठी झटले पाहिजे. रंधवा यांनी २०१९च्या पुलवामा हत्याकांडाचीही चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. शिवाय देशभरात विविध ठिकाणी हिंडेनबर्गच्या मुद्द्यावरून आंदोलनेही होत आहेत.

Exit mobile version