आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रेस इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक तळाला असल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी समाचार घेतला. हा मनाचा खेळ असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
‘मी भारताचा क्रमांक पाहून आश्चर्यचकित झालो. मला वाटले की, आपल्याकडे सर्वांत मुक्त पत्रकारिता आहे आणि कोणीतरी मूलभूतपणे काहीतरी चूक करत आहे,’ मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावरील संवादात्मक सत्रादरम्यान जयशंकर म्हणाले. भारताच्या क्रमांकाची अफगाणिस्तानशी तुलना करताना ते म्हणाले, “अफगाणिस्तान आपल्यापेक्षा मुक्त आहे. आपण कल्पना करू शकता? मी लोकशाही निर्देशांक, स्वातंत्र्य निर्देशांक, धार्मिक स्वातंत्र्य निर्देशांक आणि पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक पाहतो,’ असे ते म्हणाले. आपल्याला आवडत नसलेल्या देशाचा क्रमांक खाली आणला जातो, अशी टीका त्यांनी केली.
रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने (RSF) प्रेस इंडेक्स जारी केल्यानंतर काही दिवसांनी जयशंकर यांनी हे विधान आले आहे. या निर्देशांकात भारताला १६१वा क्रमांक देण्यात आला आहे. तर, अफगाणिस्तान १५२व्या क्रमांकावर आहे. १७९ देशांमध्ये चीन शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे.
गेल्या वर्षी भारत १५०व्या क्रमांकावर होता. यावेळी, भारताची ११ क्रमांकांनी घसरण झाली आहे. अधिवेशनादरम्यान जयशंकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. “मी राहुलकडून चीनवर क्लास घेण्याची ऑफर दिली असती. पण मला कळले की, तेच चीनवर चीनच्या राजदूताकडून क्लास घेत होते,’ अशी टीका त्यांनी केली. मोदी सरकारने चीनसोबतचे संबंध हाताळल्याबद्दल केलेल्या टीकेला उत्तर दिले. डोकलाम संकटाच्या वेळी भारतातील चीनच्या राजदूतांची राहुल गांधी यांनी घेतलेल्या भेटीचा संदर्भ दिला.
हे ही वाचा:
ऑपरेशन कावेरी म्हणजे ‘इंडिया फर्स्ट’ धोरणाचा डंका
काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षाला दीड कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी अटक
घरावर मिग- २१ विमान कोसळून दोघांचा मृत्यू
सुदानमधून आलेले भारतीय मोदींच्या प्रेमात
‘मला माहीत आहे की राजकारणातील प्रत्येक गोष्ट राजकीय असते. मला ते मान्य आहे. परंतु मला वाटते की काही मुद्द्यांवर, विशेषत: आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली बाजू कमकुवत होऊ नये, अशा प्रकारणे वर्तणूक ठेवणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,’ असे ते म्हणाले.