पुतिन यांच्याकडून मोदींचे कौतुक; ‘भारताच्या हितरक्षणासाठी मोदी कठोर भूमिका घेतात’

त्यांच्या कठोर भूमिकेमुळे मला कधी कधी आश्चर्य वाटते

पुतिन यांच्याकडून मोदींचे कौतुक; ‘भारताच्या हितरक्षणासाठी मोदी कठोर भूमिका घेतात’

‘भारताचे पंतप्रधान देशातील लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कठोर भूमिका घेतात,’ अशा शब्दांत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांचे धोरण हे भारत आणि रशिया यांच्यातील सुदृढ संबंधांची हमी आहे, हेदेखील त्यांनी अधोरेखित केले.

रशियाचे अध्यक्ष म्हणाले, ‘भारताच्या किंवा भारतीयांच्या हिताविरुद्ध निर्णय घेण्यासाठी मोदींना धमकावले जाऊ शकते किंवा त्यांच्यावर दबाव आणला जाऊन त्यांना तसे निर्णय घेण्यास भाग पाडले जाऊ शकते, याची मी कल्पनाही करू शकत नाही. मला माहीत आहे की, त्यांच्यावर असा दबाव आहे,’ असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

नोकरी सोडली, कायद्याचा अभ्यास केला आणि वडिलांच्या मारेकऱ्यांना दिली शिक्षा

२ कोटींचे हशिश ऑइल जप्त, दोन जणांना अटक

१२ वर्षाच्या मुलीला लोटले देहव्यापारात

भारतीय संघाला विमानतळावरच पावसाने गाठले

ते भारतात काय घडत आहेत, ते ये बाहेरून पाहात आहेत, असे ते म्हणाले. ‘प्रामाणिकपणे सांगायचे तर, भारतीय लोकांच्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याच्या त्यांच्या कठोर भूमिकेमुळे मला कधी कधी आश्चर्य वाटते,’ असेही ते म्हणाले.
रशियन राष्ट्रपतींनी असेही नमूद केले की, रशिया-चीन संबंध सर्व दिशांनी सतत विकसित होत आहेत आणि याची मुख्य हमी पंतप्रधान मोदींचे धोरण आहे.

गेल्या महिन्यात भारताने आयोजित केलेल्या विशेष आभासी जी २० परिषदेत रशियाने भारताच्या जी २० अध्यक्षपदाखाली झालेल्या नवी दिल्ली शिखर परिषदेत चांगले परिणाम मिळवून अत्यंत उत्पादनक्षम काम केल्याबद्दल मोदी यांचे कौतुक केले होते.

Exit mobile version