रुपाली पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

रुपाली पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पुण्यातील आक्रमक महिला नेत्या अशी ओळख असलेल्या रूपाली पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. गुरुवार, १६ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. रुपाली पाटील यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुण्यात आणखी मजबूत होईल असा विश्वास पक्षातील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

दहा महिलांसह पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवार यांनी रुपाली पाटील यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले आहे. तर त्यांच्या आक्रमकपणाचेही अजित दादांनी कौतुक केले आहे. आगामी काळात पुण्यात महिलांचा मोठा मेळावा घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

शरद पवार वाचणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली ट्विटरवर ठरले सर्वाधिक लोकप्रिय!

बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्यामुळे हाताला काम मिळेल!

अनिल परबांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे अर्धशतक!

रूपाली पाटील या मनसेच्या आक्रमक महिला नेत्यांपैकी एक मानल्या जात होत्या. त्या कायमच राज ठाकरे यांच्याशी प्रामाणिक असलेल्या आणि निकटवर्तीय असल्याचे मानले गेले आहे. विद्यार्थी दशेपासून राजकारणात सक्रिय असलेल्या पाटील आधी शिवसेनेत कार्यरत होत्या. पण राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा पाटील यांनी देखील शिवसेनेला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसेच्या तिकिटावर त्या नगरसेवक म्हणूनही निवडून आल्या होत्या.

Exit mobile version