स्वतःच्या जुळ्या मुलांना पाहण्याआधी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी धाव

भाजप कार्यकर्त्याचा उत्साह पाहून पंतप्रधान मोदी भावूक

स्वतःच्या जुळ्या मुलांना पाहण्याआधी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी धाव

तमिळनाडूमधील एका भाजप कार्यकर्त्याच्या पत्नीने सोमवारी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र स्वतःच्या जुळ्या मुलांचे चेहरे पाहण्याआधी हा कार्यकर्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी चेन्नई विमानतळावर गेला होता. त्याचा हा अगत्यशील स्वभाव पाहून पंतप्रधान मोदी भावूक झाले. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून पक्षाप्रति सर्वस्व वाहणारे कार्यकर्ते लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

‘चेन्नई विमानतळावर आमच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यात श्री अस्वंथ पिजाई हेदेखील होते. त्यांनी मला सांगितले की, त्यांच्या पत्नीने नुकताच दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे, परंतु त्यांनी त्यांची अद्याप भेट घेतलेली नाही. मी त्याला तू येथे आले पाहिजे नव्हतेस, असे सांगून माझ्या शुभेच्छा त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना दिल्या,’ असे मोदी यांनी लिहिले आहे. ‘पक्षामध्ये असे समर्पित भावनेने वाहिलेले कार्यकर्ते पाहून आनंद होतो. आपल्या कार्यकर्त्यांचे असे प्रेम आणि आपुलकी पाहून भावूक झालो,’ असेही मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकणार

विभागीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत आलोक, दुर्वाला सुवर्ण

भाजपाने चंदीगड उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली

बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोटाचा तपास एनआयएकडे!

चेन्नईत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मोठी सभा घेतली. तिथे त्यांनी गेल्या वर्षी चेन्नईत उद्भवलेली पूरपरिस्थिती हाताळण्यात सत्ताधारी द्रमुक सरकार अपयशी ठरल्याची टीका केली.

Exit mobile version