मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या पालघर जिल्हा मुख्यालयासमोरचा रस्ता पाण्याखाली

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या पालघर जिल्हा मुख्यालयासमोरचा रस्ता पाण्याखाली

पालघरमध्ये गेले काही दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून या जिल्ह्यातील कोलगाव येथे पालघर जिल्हा मुख्यालयासमोरील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. याच मुख्यालयाचे ऑनलाइन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तीन दिवसांपूर्वी झाले. पण हे उद्घाटन झाले नाही तोवर मुख्यालयाबाहेरचा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे आणि खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांनी मुख्यालयाच्या उद्घाटनाला प्रत्यक्ष हजर राहणे टाळले होते. पण आता याच मुख्यालयाच्या बाहेरचा परिसर पाण्याखाली गेला आहे. सिडकोने हे मुख्यालय उभारले असून जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद, नवी प्रशासकीय इमारत आणि न्यायालय या मुख्यालयात असणार आहेत.

जवळपास १०३ हेक्टर जागेवर ही इमारत उभी राहिली आहे. या मुख्यालयासमोरील रस्ताच पाण्याखाली गेल्यामुळे आता या मुख्यालयात जायचे कसे, लोकांनी आपल्या तक्रारी, गाऱ्हाणी मांडायची कुठे असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. निदान मुख्यमंत्री व इतर मंत्री विमानाने तिथे येऊ शकतात, पण सर्वसामान्यांना तिथे पोहोचण्याचा अन्य मार्गच नाही, असेही लोक बोलत आहेत.

हे ही वाचा:

एअरफोर्सच्या गणवेशातील कंगना वाह भाई वाह

हिंदुत्वाचे महामेरू कल्याण सिंह कालवश

सायकल ट्रॅक हवाय कशाला?

एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत, नारायण राणेंचा दावा

गेले तीन दिवस इथे मुसळधार पाऊस पडत आहे आणि येत्या काही दिवसांतही असाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे आधुनिक असे हे मुख्यालय उभारण्यात आले असले तरी त्याबाहेरील रस्ता मात्र जर पाण्याखाली जात असेल तर ही प्रशस्त इमारत बांधण्यामागचा उद्देश तरी काय, असा सवाल स्थानिकांना पडला आहे.

 

Exit mobile version