उत्तरप्रदेश: आरएलडी पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी भाजपसोबत युती करण्याच्या मार्गावर?

पश्चिम बंगाल, बिहारनंतर उत्तरप्रदेशमध्ये इंडी आघाडीत फूट पडण्याची शक्यता

उत्तरप्रदेश: आरएलडी पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी भाजपसोबत युती करण्याच्या मार्गावर?

पश्चिम बंगाल आणि बिहारनंतर आता उत्तर प्रदेशमध्येही ‘इंडी आघाडी’ची युती तुटण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. आरएलडी आणि समाजवादी पक्षाची युती तुटू शकते अशी बातमी समोर आली आहे.आरएलडीचा आमदारांना दिल्लीत बोलावण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर आरएलडीचे आमदार दिल्लीला जातील आणि आरएलडी पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांच्याशी युतीबाबत चर्चा करतील

मिळालेल्या माहितीनुसार, आरएलडीने भाजपकडे कैराना, मथुरा, बागपत, अमरोहा आणि मुझफ्फरनगर या जागांची मागणी केली आहे. मथुरा आणि मुझफ्फरनगर या जागांवरील भाजप आणि आरएलडी यांच्यातील वाद सुटला तर युतीची अधिकृत घोषणाही केली जाऊ शकते. परंतु, भाजप आरएलडीला तीन जागा देण्यास तयार आहे, ज्यामध्ये कैराना, बागपत आणि अमरोहा या जागांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

पुढील अधिवेशनात राजस्थान स्वतःचे समान नागरी विधेयक आणणार!

‘आरक्षणाच्या लाभार्थींना त्यातून बाहेर काढले पाहिजे’

हरदा फटाका कारखान्याच्या मालकासह तिघांना अटक

पेपरफुटी आणि बनावट प्रश्नपत्रिकांना रोखणारे विधेयक लोकसभेत मंजूर!

मुझफ्फरनगर, कैराना आणि बिजनौर या जागांवर आरएलडीचा समाजवादी पक्षासोबत वाद असल्याचे बोलले जात आहे.कैराना, मुझफ्फरनगर आणि बागपत या जागांवर समाजवादी पक्ष आरएलडीच्या चिन्हावर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे बोलले जात होते.याच मुद्द्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे.विशेष म्हणजे, समाजवादी पक्षाकडून आरएलडीसाठी ७ जागा देणार असल्याचे म्हटले होते.मात्र, त्या कोणत्या जागा आहेत याबाबत सपाने सस्पेन्स ठेवला.या मुद्यावरून आरएलडीमध्येही नाराजीचे चित्र होते.

दरम्यान, आरएलडीचे राष्ट्रीय प्रवक्ते रोहित जाखड यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आणि म्हणाले की, भाजपसोबत युतीची चर्चा ही एक अफवा असल्याचे त्यानी म्हटले आहे. ते म्हणाले की, आरएलडी भाजपविरोधात लढत आली आहे आणि लढत राहील. इंडी आघाडी अंतर्गत निश्चित झालेल्या जागांवर आरएलडी निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version