27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणराष्ट्रीय लोक दलाचा ‘इंडी’ला रामराम; ‘एनडीए’ला देणार साथ

राष्ट्रीय लोक दलाचा ‘इंडी’ला रामराम; ‘एनडीए’ला देणार साथ

राष्ट्रीय लोक दलचे (रालोद) अध्यक्ष जयंत चौधरी यांनी केली घोषणा

Google News Follow

Related

केंद्रात भाजपाला पर्याय म्हणून देशभरातील विरोधकांनी ‘इंडी’ आघाडी उघडली होती. ‘एनडीए’ला धोबीपछाड देण्याचा या आघाडीचा मनसुबा होता. मात्र, या इंडी आघाडीत काहीच आलबेल नसल्याचे वारंवार समोर आले आहे. छोट्या छोट्या पक्षांनी इंडी आघाडीची साथ सोडली आहे. दरम्यान, प. बंगालमधून तृणमूल कॉंग्रेस, पंजाबमध्ये ‘आप’नेही स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे इंडी आघाडीतील बिघाडी वाढत असून आता आणखी एका पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करत इंडी आघाडीला रामराम करत ‘एनडीए’ची साथ देण्याचे ठरविले आहे.

लोकसभा निवडणूकीत भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधकांच्या आघाडीला पुन्हा मोठा झटका बसला आहे. राष्ट्रीय लोक दलचे (रालोद) अध्यक्ष जयंत चौधरी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत त्यांचा पक्ष ‘एनडीए’मध्ये सहभागी होत असल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा सोमवार, १२ फेब्रुवारी रोजी केली.

पक्षातील सर्व आमदारांशी चर्चा केल्यानंतर एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. आमदारांच्या नाराजीवर बोलताना ते म्हणाले की आम्ही सर्व आमदारांशी चर्चा केली आहे. आमचे सर्व आमदार आणि कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात आले आहे. हे माझ्या कुटुंबासाठी आणि शेतकऱ्यांसाठी खूप मोठा सन्मान आहे, असेही जयंत चौधरी यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

भारतातील उद्योग संघटना एक राष्ट्र, एक निवडणुकीच्या पाठीशी

‘जे मोदींवर टीका करतात, त्यांना राज्यसभेचे तिकीट मिळते’

हल्द्वानी हिंसाचाराप्रकरणी ३० जणांना अटक

मोठा निर्णय! ‘सीआरपीएफ’ची परीक्षा मराठीत देता येणार

जागावाटपावरूनही इंडी आघाडीत वाद असल्याच्या चर्चा आहेत. यावरून तृणमूल आणि आप हे इंडिया आघाडीतून बाहेर पडले आहेत. त्यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे. जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनीही इंडिया आघाडीबाबत स्पष्ट मत व्यक्त केले होते. वेळ गेलेली नाही. मात्र, जागावाटपावर एकमत झाले नाही, तर इंडिया आघाडीचे काही खरे नाही, असा इशारा फारूक अब्दुल्ला यांनी दिला होता. इंडिया आघाडीतील जागा वाटपाबद्दलही समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनीदेखील इंडी आघाडीतील बिघडलेल्या ताळमेळ परिस्थितीबद्दल भाष्य केलं होतं. राहुल गांधी यांच्या यात्रेआधी लोकसभा निवडणुकीसाठीचं जागावाटप पूर्ण करायला हवं. आधी जागावाटप, त्यानंतर यात्रा आणि मग निवडणूक असा क्रम असायला हवा. तसं केल्यास आपण सगळेच जण भक्कमपणे भाजपाविरोधात लढू शकतो, असं ते म्हणाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा