25 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरक्राईमनामामो. पैगंबरांना बदनाम करणाऱ्या प्रत्येकाचा शिरच्छेद करण्याचे ‘त्याने’ केले होते आवाहन

मो. पैगंबरांना बदनाम करणाऱ्या प्रत्येकाचा शिरच्छेद करण्याचे ‘त्याने’ केले होते आवाहन

Google News Follow

Related

उदयपूर येथे एका टेलर युवकाचा शिरच्छेद करणारा मोहम्मद रियाझ अख्तारी याने १७ जूनलाच व्हीडिओ करून मो. पैगंबर यांच्याबद्दल जो बदनामीकारक वक्तव्य करेल त्याचा शिरच्छेद करणार असल्याचे म्हटले होते तसेच त्याने इतर मुस्लिमांनाही असे करण्याचे आवाहन केले होते. त्याला त्यावेळीच ताब्यात घेण्यात आले असते तर ही शिरच्छेदाची घटना घडली नसती असे आता बोलले जात आहे. या घटनेतील दोन्ही मुस्लिम युवकांना आता अटक करण्यात आली आहे.

रियाझने या व्हीडिओत असेही म्हटले होते की, मुस्लिमांनी आपल्या कुटुंबियांबाबत आणि आपल्या व्यवसायाबाबत कोणतीही चिंता करू नये. कारण आपणही नोकरी करतो पण मो. पैगंबरांसाठीच जिवंत आहे. मृत्यूमुळे जन्नत प्राप्त होते. जे मो. पैगंबरांसाठी असे शिरच्छेद करणार नाहीत ते पळपुटे आहेत. त्यांनी हातात बांगड्या भरल्या पाहिजेत. मी ज्याचा शिरच्छेद करीन त्याचा व्हीडिओ बनवेन. लोकांच्या शिरच्छेदाची परंपरा आपण सुरू करणार असलो तरी इतर मुस्लिमांनीही ती परंपरा पुढे न्यावी.

हे ही वाचा:

मविआने बहुमत सिद्ध करावे; भाजपाची राज्यपालांकडे मागणी

कुर्ला इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली; १९ मृत्यू

नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या युवकाचा मुस्लिम तरुणांनी केला शिरच्छेद; पंतप्रधान मोदींनाही मारण्याची दिली धमकी

माकडाला चिप्स देताना तो पडला दरीत!

 

मंगळवारी दुपारी उदयपूरमध्ये कन्हैय्यालाल या टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या युवकाला फसवून दोन मुस्लिम युवकांनी ठार मारले. त्याचा शिरच्छेद केला. कपडे शिवण्यासाठी आल्याचा बहाणा करत त्यांनी त्या युवकाला धारदार शस्त्रांनी ठार केले. शिवाय, त्यानंतर व्हीडिओ करत या कृत्याचे समर्थनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही आपण हत्या करू असेही विधान त्यांनी केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा