24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामारियाझ भाटी म्हणतो, मी राष्ट्रवादीचाच

रियाझ भाटी म्हणतो, मी राष्ट्रवादीचाच

Google News Follow

Related

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावर आज हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचं म्हणत नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेतली आणि देवेंद्र फडणवीसांवर अनेक आरोप केले. परंतु मलिक यांनी घेतलेली मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाझ भाटी, समीर वानखेडे अशी अनेक नावं भाजपाशी संबंधितच नसल्याचं उघड होत आहे. यातीलच एक रियाझ भाटी याने स्वतःच सांगितले आहे की तो भाजपाचा सदस्य तर नाहीच परंतु राष्ट्रवादीच्याच सदस्य होता.

“मी राष्ट्रवादीचाच – रियाझ भाटी. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची  स्थापना झाली होती तेव्हापासून रियाझ भाटी राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जनरल सचिव म्हणून तो काम करत होता. पहा काय म्हणतोय रियाज भाटी.” असं ट्विट भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाझ भाटी, समीर वानखेडे अशी अनेक नावं घेऊन त्यांनी खूप मोठं चित्र उभं करण्याचा प्रयत्न जरुर त्यांनी केला, पण तो विफळ ठरला. याचं कारण देवेंद्र फडणवीसांशी जोडणं याचा प्रयत्न नवाब मलिकांनी केला, पण त्यात सत्य नाही, असं म्हणत नवाब मलिकांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केला. संपूर्ण राज्य सरकारची यंत्रणा तिन्ही पक्षांनी एकत्र लावूनसुद्धा देवेंद्र फडणवीसांवर चिकटणारा तर सोडाच, पण लागू शकेल असा आरोपही मलिक करु शकले नाहीत, असं आशिष शेलार म्हणाले.

हे ही वाचा:

३४% जागांवर भाजपाचा बिनविरोध विजय

पंजाबमध्ये पुन्हा मुख्यमंत्र्यांवर सिद्धू भारी

‘मराठी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल ठाकरे सरकारला आपुलकी नाही’, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल

नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? हर्षदा रेडकर यांची पोलीस तक्रार

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत हा धमाका केला आहे. फडणवीसांच्या या धमाक्यामुळे नवाब मलिक आणि महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फडणवीस यांनी या आधीच १ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार फडणवीस यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा