ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी

ब्रिटनमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना ब्रिटनला अखेर आता पंतप्रधान मिळाले आहेत.

ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी

ब्रिटनमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना ब्रिटनला अखेर आता पंतप्रधान मिळाले आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीमधून माघार घेतल्यानंतर ऋषी सुनक यांच्या हाती पंतप्रधान पदाची सूत्रे जाण्याची दाट शक्यता होती. अखेर ऋषी सुनक यांनी आघाडी घेत विजय मिळवला आहे.

ऋषी सुनक हे या पूर्वी ब्रिटनचे अर्थमंत्री राहिलेले आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी शंभर खासदारांचं बहुमत आवश्यक असतं. त्यानुसार ऋषी सुनक यांना १४५ पेक्षा जास्त खासदारांचं समर्थन मिळालं आहे. आता औपचारिक घोषणेनंतर, ऋषी सुनक हे २८ ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात आणि २९ ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी ४५ दिवसांच्या कार्यकाळानंतर गुरुवारी अचानक पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. वादग्रस्त ‘मिनी बजेट’ मधील कररचनेवर माघार घ्यावी लागत असल्याने ट्रस यांनी अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांची हकालपट्टी केली होती. ‘मिनी बजेट’मधील कररचनेमुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था प्रचंड धोक्यात आली आहे. त्यानंतर गृहमंत्री सुएला यांनी सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचं सांगत राजीनामा दिला होता.

हे ही वाचा:

जवान देशभक्तीपर गाणी गात असताना पंतप्रधान मोदींनी घेतला आनंद

मुंबई विकास महामंडळ; रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटणार

राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल ही माहिती आली समोर

ब्रिटनची आर्थिक स्थिती सध्या डळमळीत झालेली आहे. त्यामुळेच लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ऋषी सुनक यांचं नाव चर्चेत आलेलं होतं. आता ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला ऋषी सुनक सावरणार का याकडे लक्ष असणार आहे.

Exit mobile version