ब्रिटनच्या आरोग्य सचिव, अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा

ब्रिटनच्या आरोग्य सचिव, अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा

ब्रिटनचे बोरिस जॉन्सन सरकार सध्या अडचणीत सापडले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता एकाच वेळी दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. ब्रिटनचे आरोग्य सचिव साजिद जविद आणि अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. “सरकार योग्य, गांभीर्याने आणि सक्षमपणे चालवले जाईल, अशी जनतेची अपेक्षा असते. मंत्री म्हणून ही माझी शेवटची नोकरी असू शकते. परंतु, मला विश्वास आहे की, हे कारण लढण्यासाठी योग्य आहे. त्यामुळेच मी राजीनामा देत आहे,” असे ट्विट त्यांनी केलं आहे.

आरोग्य मंत्री साजिद जविद यांनीही राजीनामा दिला आहे. या पदावर काम करून आनंद झाला पण यापुढे हे काम न करण्याचं दुःख आहे,” असं तर ते म्हणाले. यानंतर बोरिस यांचं सरकार अडचणीत आले असून बोरिस जॉन्सनसुद्धा राजीनामा देऊ शकतात अशा चर्चा आहेत.

हे ही वाचा:

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडिजचा स्पीड फिका पडला…

उद्धवजी, मुर्मूना पाठिंबा द्या! खासदार राहुल शेवाळे यांचा लेटरबॉम्ब

वीर सावरकरांचे विचार आम्हाला महाविकास आघाडीत असताना मांडता येत नव्हते!

शिवसेनेत किती संतोष बांगर उरलेत???

आरोग्य मंत्री साजिद जाविद यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचे ब्रिटीश मंत्री ऋषी सुनक यांनीही राजीनामा दिला आहे. जॉन्सन सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी एका माजी सनदी अधिकाऱ्यानं निलंबित खासदार ख्रिस पिंचर यांच्यावरील आरोपांबाबत ब्रिटीश पंतप्रधानांवर टीका केली होती. ‘लोकांच्या सरकारकडून अपेक्षा आहेत. सरकारनं योग्य, सक्षम आणि गंभीर पद्धतीनं काम करावं’ असं ट्विट त्यांनी केलं होतं.

Exit mobile version