संसदेत सध्या अविश्वास ठरावावरून चर्चा सुरू आहे. त्यात मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर आपापली मते खासदार व्यक्त करत आहेत. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी यानिमित्ताने विरोधकांवर शरसंधान केले.
यूपीए सरकार असताना आम्ही त्या सरकारला हात जोडून विनंती करत असू की आपण इशान्येकडील राज्यांकडे लक्ष द्या. पण त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कधी इशान्य भारताचा दौरा केला नाही. खरे तर ते आसाम राज्यातूनच खासदार बनले होते. आमची संख्या कमी म्हणून आम्हाला कमी वेळ बोलायला दिला जात असे. पण मी आज अरुणाचल प्रदेशातून केंद्रीय मंत्री बनलो आहे. २०१४मध्ये नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून तिथे एकही दहशतवादी उभा राहिलेला नाही. आतंकवादात ८१ टक्के घट झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये ९७ टक्के घट झाली आहे, असे रिजिजू म्हणाले.
हे ही वाचा:
अविश्वास ठरावासाठी बीजेडीचा मोदी यांना पाठिंबा का?
चीनच्या पे-रोलवर पोसलेले पत्रकार किती?
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२ रेल्वे स्थानके चमकणार
मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन सुवर्ण पदकाची मानकरी!
इशान्य भारताबद्दल बोलताना विरोधकांनी थोडा अभ्यास करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, या राज्यांबद्दल अफवा पसरविण्याचे काम विरोधक करत आहेत. शेवटी आपण सगळे या संसदेचे सदस्य आहोत. एनडीएचे सगळे मंत्री नेहमी इशान्य भारताचा दौरा करतात. ६६ वर्षांत आपण कोणताही विचार इशान्य भारताचा केला नाहीत पण नरेंद्र मोदी यांनी याच भागाच्या विकासाची कल्पना प्रत्यक्षात आणली.
मोदी सरकारच्या काळातच इशान्येकडील राज्यांतल्या युवकांचा इतर राज्यांतील युवकांशी संपर्क वाढविण्याचे काम विविध मोहिमेंच्या आधारे झाले. १९५९मध्ये चीनने जिथे आक्रमण केले होते तिथपर्यंत चीनला आजही रोखलेले आहे. तुम्ही माझ्यासोबत अरुणाचल प्रदेशात या. मी तुम्हाला वास्तवाचे दर्शन घडवेन, असेही रिजिजू म्हणाले. रिजिजू यांनी गेल्या ९ वर्षातील मोदी सरकारच्या कार्याचा उल्लेखही केला.