अमेरिकन पॉप स्टार रिहानाने खलिस्तानी संघटनांशी संबंध असलेल्या एका पीआर (पब्लिक रिलेशन्स) संस्थेकडून ₹१८ कोटी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅनडास्थित पोएटीक जस्टिस फाउंडेशन (पीजेएफ) चे संस्थापक धालीवाल, ज्याने स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने ट्विट केलेले वादग्रस्त ‘टूलकिट’ तयार केले होते. ते स्कायरोकेट या पीआर फर्मचे संचालक आहेत.
हे ही वाचा:
स्कायरोकेटशी जोडल्या गेलेल्यांमध्ये मारिना पॅटरसन या पीआर कंपन्यांमध्ये काम करत असून सध्या शेतकरी आंदोलन चिथवण्याबद्दल भारतीय एजन्सीजच्या रडारवर आहेत. कॅनडास्थित ‘वर्ल्ड शीख ऑर्गनायझेशन’चे संचालक अनिता लाल, पीजेएफचे सह-संस्थापक आणि कॅनडाचे खासदार जगमीत सिंग हे देखील स्कायरोकेटशी संबंधित आहेत.
कॅनडामधील राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांच्या पाठिंब्याने “जागतिक मोहीम सुरू” करण्यात पीजेएफने “महत्वाची भूमिका” बजावली. अशी माहिती द प्रिंटच्या अहवालातून मिळाली.
पीजेएफ ही संस्था स्वतःला, ‘तळागाळातील लोकांना वकील आणि कायदेशीर मदत पुरवण्याचे काम करणारी संस्था.’ म्हणवते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, “कोणताही प्रचार-प्रसार भारतातील ऐक्य रोखू शकत नाही किंवा देशाला नवीन उंची गाठण्यापासून रोखू शकणार नाही.” तसेच सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार, कंगना राणावत आणि अजय देवगण आणि चित्रपट निर्माते करण जोहर यांच्यासारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनीही ‘खोट्या प्रचारापासून सावध रहा’ असा सल्ला दिला.