पुढील वर्षी होत असलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा कशी डागाळता येईल, यासाठी जेवढी खालची पातळी गाठता येईल तेवढी गाठण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाला पाठिंबा देण्यासाठी ट्विट करा अशा संवादाची एक बनावट ऑडिओ क्लिप समोर आली होती. यात अभिनेता गजेंद्र चौहान यांचेही नाव घेण्यात आले असून फेक अकाऊंटवरून भाजपा नावाने ट्विट करण्यास सांगण्यात येत असल्याचे ऐकायला मिळते. या ऑडिओ क्लिपचा आधार घेऊन २ रुपयात ट्विट करण्यास पण आता त्याचा पुरता पर्दाफाश झाला आहे.
ही बनावट ऑडिओ क्लिप सूर्यप्रताप सिंह या माजी आयएएस अधिकाऱ्याने व्हायरल केली होती. गेले काही महिने सातत्याने भाजपा सरकारविरुद्ध अशी खोटीनाटी माहिती देण्यात हा माजी अधिकारी आघाडीवर असतो. त्यासंदर्भात उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही ऑडिओ क्लिप बनावट असल्याचे सिद्ध झाले असून योगी सरकारची बदनामी करण्यासाठीच ‘२ रु. योगी टूलकिट’ या नावाने ही क्लिप वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे.
अतुल कुशवाहा याने केलेल्या तक्रारीतून ही गोष्ट पुढे आली. उत्तर प्रदेश पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतल्यानंतर हे स्पष्ट झाले की, ही क्लिप बदनामी करण्यासाठीच तयार करण्यात आली होती. कानपूर नगर मीडिया सेलचे याबाबतचे म्हणणे होते की, आशीष पांडे आणि अतुल कुशवाहा हे सोशल मीडिया व्यवस्थापन क्षेत्रात काम करतात. त्यांच्यातील व्यावसायिक स्पर्धेमुळे पांडेने कुशवाहाची कारकीर्द उद्ध्वस्त करण्याची योजना आखली.
हे ही वाचा:
६१ दिवसांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद
भारताची लसीकरणात इतर देशांच्या तुलनेने भरारीच!
उल्हासनगरमधील ५०० हून अधिक इमारती निकृष्ट
मराठा आरक्षण हा राज्याचाच विषय: उदयनराजे भोसले
पांडेने हिमांशू सैनी या आपल्या एका सहकाऱ्याची मदत घेतली. सैनीने १५ वर्षीय मुलाला त्यासाठी भरीस पाडले. त्याने त्याच्यासह दोनवेळा फोनवरून संवाद साधला आणि त्याचे रेकॉर्डिंग केले. हे ऑडिओ नंतर एडिट करण्यात आले आणि ते व्हायरल केले गेले. हाच ऑडिओ नंतर या आयएएस अधिकाऱ्याने ट्विटरवर शेअर केला. तथाकथित पत्रकार रोहिणी सिंगनेही तो ट्विट केला.
या आठवड्याच्या प्रारंभी सूर्यप्रताप सिंग तसेच हिमांशू सैनी, पुनित सैनी यांच्याविरोधात कानपूर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. अतुल कुशवाहाने ही तक्रार केली होती. राजकारणासाठी विरोधकांनी सोशल माडियावर आपल्या नावाची बदनामी केली. हा ऑडिओ योगी सरकारची बदनामी करण्यासाठीही बनविण्यात आला होता.
न्यूज १८ लाही मागावी लागली होती माफी
दोन महिन्यांपूर्वी न्यूज १८ या चॅनेलने योगी आदित्यनाथ यांची माफी मागितली होती. त्यांनी अशी बातमी दाखविली होती की, उत्तर प्रदेशात कोरोना नसल्यातच जमा आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. पण नंतर या चॅनेलने आपण चुकीची बातमी दिल्याची कबुली देत माफी मागितली होती. उत्तर प्रदेशात ऑक्सिजनची कमतरता नसल्यातच जमा आहे, असे त्यांचे म्हणणे होते, पण या चॅनेलने चुकीची बातमी प्रसारित केली. हा देखील योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा डागाळण्याचाच एक प्रकार होता.