27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणसोमय्या पितापुत्रांचा संध्याकाळपर्यंत निकाल राखीव

सोमय्या पितापुत्रांचा संध्याकाळपर्यंत निकाल राखीव

Google News Follow

Related

आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अटक टाळण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. त्याबद्दल किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीनावरील युक्तिवाद पूर्ण झाला आहे. मात्र, न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला असून संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर करणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

राज्य सरकारने न्यायालयात, या कथित आरोपात किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. तर सोमय्या पितापुत्रांचे बँक व्यवहारांचे तपशील मागत त्या रकमेतून काही मालमत्ता खरेदी केल्यात का?, याची चौकशीही करण्यास सांगितले आहे.

आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत सोमय्यांनी घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊता यांनी केला होता. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्यायांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

मानखुर्दमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत वाद

अभिनेते, पटकथा लेखक शिव सुब्रमण्यम यांचे निधन

मांसाहारावरून जेएनयूमध्ये वाद, सहा विद्यार्थी जखमी

झारखंडमध्ये रोपवेच्या ट्रॉली धडकून अपघात; तीन जणांचा मृत्यू

किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीनावरील युक्तीवाद आज पूर्ण झाला असून, यावरील निकाल संध्याकाळपर्यंत राखीव ठेवण्यात आला आहे. यादरम्यान न्यायालयात आज झालेल्या युक्तीवादात सोमय्यांच्या बाजूने न्यायालयात बचावासाठी युक्तीवाद करण्यात आला. तसेच अशा कोणत्याही प्रकाचा निधी आपल्याकडे सोपवला गेला नव्हता असे सांगण्यात आले आहे. तसेच जमवलेले पैसे पक्षाकडे दिल्याचा दावा सोमय्यांकडून करण्यात आल्याचे सरकारी वकीलांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा