अलिबागमधील कोर्लई प्रकरणात उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे कोर्लई येथे जमीन आहे. या जागेत असलेल्या कथित बंगल्या प्रकरणी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या बंगल्यांविषयी नवी माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरे परिवाराच्या कोर्लई येथील कथित १९ बंगल्यांशेजारी समुद्र किनाऱ्यावर एक मोठा रिसॉर्ट बांधण्याचे काम सुरु असल्याची माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. हा अनधिकृत रिसॉर्ट बांधण्याची परवानगी उद्धव ठाकरे गटाचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी २०२१ मध्ये दिल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
रविवार, ९ जुलै रोजी किरीट सोमय्या यांनी पोलिस अधिकार्यांसोबत या रिसॉर्टची पाहणी केली. त्यानंतर सोमवारी जिल्हाधिकारी आणि संबंधीत अधिकार्यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक (MRTP) कायद्या अंतर्गत कारवाई होणार आहे. तसेच या बेनामी रिसॉर्टचे पाडकाम पुढील काही दिवसात सुरु होणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
हे ही वाचा:
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कामासाठी पिंडवाराचे १००० कारागीर लागले कामाला
उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा हाहाःकार; रस्ते, पूल गेले वाहून
बेहिशोबी मालमत्ता जमवणारे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओमप्रकाश सोनी अटकेत
धक्कादायक! गोरेगावमध्ये रिक्षात महिलेवर अतिप्रसंग
रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावाने १९ बंगले अनधिकृतपणे बांधण्यात आले होते. पण, आरोप करण्यात आल्यानंतर हे १९ बंगले जमीनदोस्त आले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी याबाबत तक्रार सुद्धा दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आतापर्यंत सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावातील माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली होती.