राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. जागावाटपावरून पारस हे नाराज असल्याची माहिती असून त्यांनी थेट केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. पशुपती पारस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत राजीनामा दिल्याची माहिती आहे.
बिहारमध्ये जागा वाटप जाहीर झालं असून राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी म्हणजेच आरएलजेपीला जागा वाटपात न्याय न मिळाल्याने हा पक्ष नाराज असल्याच्या चर्चा आहेत. एनडीएमध्ये जागा वाटपावर नाराज असलेले पशुपती पारस यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. पशुपती पारस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. “मी प्रामाणिकपणे, निष्ठेने एनडीएची सेवा केली. माझ्या पक्षासोबत अन्याय झालाय. म्हणून मी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा देत आहे,” असं पशुपती पारस यांनी म्हटलं आहे. पक्ष कार्यकर्त्यांसोबत बोलून पुढच्या निर्णयाची माहिती देईन असंही पशुपती पारस यांनी म्हटलं आहे.
RLJP President Pashupati Kumar Paras resigns as Union Minister. pic.twitter.com/UyoHaLHrl8
— ANI (@ANI) March 19, 2024
हे ही वाचा:
शरियत कायदा-बहुविवाहच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार
हिमाचल प्रदेशात काँग्रेसची डोकेदुखी वाढली!
पाकिस्तानी हवाईहल्ल्याला तालिबानचे सडेतोड प्रत्युत्तर!
मोफत काम करण्यास नकार दिल्याने मजुरांच्या झोपड्या पेटवल्या!
पशुपती यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर ते इंडिया आघाडीच्या संपर्कात आहेत. पशुपती आज संध्याकाळी पटना येथे पोहोचतील. तिथे त्यांची आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासोबत भेट होईल. पशुपती पारस यांनी इंडिया आघाडीकडे सहा जागा मागितल्या आहेत. आरजेडी तीन जागा देण्यास तयार आहे.