ब्रिटनच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना आता ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. सुएला ब्रेव्हरमन यांनी राजीनामा दिला आहे. सुएला यांनी सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचं सांगत राजीनामा दिला आहे. गेल्या आठवडाभरात ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या मंत्र्याने राजीनामा दिला आहे.
सुएला ब्रेव्हरमन यांनी सरकारी दस्तऐवज लीक केल्याचा आरोप आहे. सुएला ब्रेव्हरमन या भारतीय वंशाच्या असून त्यांनी भारताविरोधी वक्तव्य केल्यामुळे त्या गेल्या काही काळापासून चर्चेत होत्या. दरम्यान, सुएला ब्रेव्हरमन यांनी आपला राजीनामा ट्विट केला आहे. “चूक लक्षात येताच ताबडतोब याची अधिकृत माहिती दिली आणि कॅबिनेट सचिवांना कळवलं. गृहमंत्री या नात्याने स्वत:ला यासाठी जबाबदार मानून राजीनामा देत आहे,” असं त्या म्हणाल्या.
राजीनामा स्वीकारला असून निर्णयाचा आदर केल्याचे ट्रस यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मंत्रीपदाची संहिता कायम ठेवली जाणे आणि मंत्रिमंडळाच्या गोपनीयतेचा आदर करणे महत्वाचे आहे, असंही त्या म्हणाल्या.
हे ही वाचा:
समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून दखल
रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?
‘ठाकरे कुटुंबियांचे उत्पन्न आणि संपत्तीचा मेळ लागत नाही’
युक्रेनवरील रशियन हवाई हल्ल्यात चार ठार
सुएला ब्रेव्हरमन यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य
भारतासोबत व्यापार करारामुळे ब्रिटनमध्ये स्थलांतरितांची संख्या वाढेल. भारत आणि ब्रिटन दरम्यान मुक्त व्यापार करारावर बोलणी सुरु असतानाच सुएला यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या भारताविरोधी वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. पुढे त्यांनी सारवासारव करताना भारतावर प्रेम असल्याच्या आशयाचं वक्तव्य केलं होतं.