देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सध्या निवडणुकीच्या प्रचारकामाला वेग आला असून दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मेहरौली विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे विद्यमान आमदार नरेश यादव यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांनी पक्षाला रामराम केला आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी राजीनामा दिल्याने ‘आप’साठी हा एक धक्का मानला जात आहे.
नरेश यादव यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, आप पक्षाचा जन्म भ्रष्टाचाराच्या विरोधात झाला होता पण आता हा पक्षचं भ्रष्टाचारात गुंतला आहे, त्यामुळे हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पार्टीचा जन्म हा भ्रष्टाचाराविरोधात, अण्णांच्या आंदोलनातून भारतीय राजकारण भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी झाला होता, पण आता मला खूप वाईट वाटतंय की आम आदमी पार्टी भ्रष्टाचार अजिबात कमी करू शकली नाही, याउलट आम आदमी पार्टी पक्षच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे. यामुळे आप पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच धक्का बसला आहे.
हे ही वाचा :
२०१२ मध्ये हाकलून लावलेले बांगलादेशी अजमेर दर्ग्याजवळ आढळले, दोघांना अटक!
अभिभाषणानंतर सोनिया, राहुल यांच्याकडून राष्ट्रपतींची खिल्ली!
देशाची अर्थव्यवस्था ६.३ ते ६.८ टक्के दराने वाढणार
शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित, तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम सुरु!
प्रामाणिकपणाच्या राजकारणासाठी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. पण, प्रामाणिकपणा कुठेच दिसत नाही. मेहरौली विधानसभेत गेली १० वर्षे मी १०० टक्के प्रामाणिकपणे काम केले आहे. प्रामाणिकपणाचे राजकारण केले, हे मेहरौलीतील लोकांना माहित आहे. मी मेहरौलीतील अनेक लोकांशी चर्चा केली, सर्वांनी सांगितले की आम आदमी पार्टी आता पूर्णपणे भ्रष्टाचारात अडकली आहे. जनतेची फसवणूक या पक्षाने केलेली आहे. प्रामाणिकपणाचे राजकारण करू असं सांगितलं जायचं पण आज पक्ष भ्रष्टाचारात पूर्णपणे गुंतला आहे, असं म्हणत त्यांनी राजीनामा दिला आहे. ते पुढे म्हणाले की, आम आदमी पक्ष भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे हे दिल्लीतील जनतेला माहित आहे कारण त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात सामावून घेतले आहे.