पुण्यामध्ये ठाकरे गटाला खिंडार, एकाच वेळी ३६ राजीनामे

पत्रकार परिषद घेत या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे जाहीर केले आहेत.

पुण्यामध्ये ठाकरे गटाला खिंडार, एकाच वेळी ३६ राजीनामे

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून ४० आमदारांबरोबर बंड केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नव्याने राज्यात सरकार स्थापन केले. या घटनेला जवळपास चार महिने झाले तरीही ठाकरे गटाला भगदाड पडने सुरूच आहे. याचदरम्यान, पुण्यामध्ये ठाकरे गटाला खिंडार पडले आहे.

पुण्यात युवती सेनेच्या सहसचिव शर्मिला येवले यांच्यासह ३६ युवती पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत राजकारणामुळे राजीनामे दिले आहेत. पत्रकार परिषद घेत या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे जाहीर केले आहेत. मात्र, आम्ही पक्षाचे कार्यकर्ती म्हणून काम करत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एकाच वेळी युवती सेनेकडून राजीनामे देत असल्याचे जाहीर केले असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एकाच वेळी युवती सेनेचा राजीनामा ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे.

शर्मिला येवले म्हणाल्या की, मागील दोन वर्षांपासून शिवसेनेच्या युवती राज्यभरात अनेक आंदोलन, निवडणुकांमध्ये काम करीत आहे. मात्र प्रत्येक वेळी युवती सेने मधील वरीष्ठ पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला चांगल्या प्रकारे वागणूक दिली गेली नाही.आंदोलन घेतले तर प्रसार माध्यमांशी का प्रतिक्रिया दिली. प्रसार माध्यमांशी संवाद साधू नका अस अनेक वेळा सांगण्यात आले, असा आरोप यावेळी शर्मिला येवले यांनी वरिष्ठ नेत्यांवर केला आहे.

हे ही वाचा : 

सजा की मजा! तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांनी घेतला मसाजचा आनंद

स्कुल व्हॅन चालकाने विद्यार्थ्यांनीवर अतिप्रसंग करण्याचा केला प्रयत्न

श्रद्धा वालकर, लव्ह जिहाद आणि हिंदू-मुस्लिम विवाह

धक्कादायक! समाजसेविकेनेच पाच दिवसांचे बाळ विकले

आपला पक्ष,आपली काम प्रसार माध्यमांमधून नागरिकांपर्यंत पोहोचू शकतो. ही बाब वरिष्ठांना सांगून देखील सतत आम्हाला कोणतीही भूमिका मांडू दिली गेली. त्यामुळे आम्ही अखेर सर्व ३६ युवती पदाधिकारी राजीनामे दिले असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र, आम्ही कार्यकर्ती म्हणून काम करत राहणार आहे. पण पक्षातील वरीष्ठ मंडळीकडून चूकीची वागणूक देत असल्याने आमच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे शर्मिला येवले यांनी सांगितले.

Exit mobile version