गृहमंत्री अनिल देखमुखांचा राजीनामा ठाकरे सरकारची घसरलेली पत दाखवतो

गृहमंत्री अनिल देखमुखांचा राजीनामा ठाकरे सरकारची घसरलेली पत दाखवतो

उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना, राज्याच्या गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांच्या प्राथमिक चौकशीची जबाबदारी सीबीआयकडे सोपवली आहे. पंधरा दिवसांच्या प्राथमिक चौकशी नंतर जर अनिल देशमुख दोषी आढळले तर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे नैतिकतेच्या तत्त्वानुसार गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजिनामा दिला आहे.

विरोधी पक्ष भाजपाकडून या प्रकरणाच्या तटस्थ चौकशीसाठी सातत्याने गृहमंत्र्यांनी राजिनामा द्यावा ही मागणी केली जात होती. आता खुद्द उच्च न्यायालयाने यात सीबीआयला तपासाचे आदेश दिल्याने गृहमंत्र्यांना नैतिकतेच्या तत्त्वाला अनुसरून राजिनामा द्यावा लागला आहे.

हे ही वाचा:

आता गृहमंत्र्यांनी नैतिकतेच्या तत्त्वाला अनुसरून राजिनामा द्यावा

अखेर अनिल देशमुखांचा राजीनामा

अक्षय कुमार पाठोपाठ विकी कौशललाही कोरोनाची लागण

भाजपाच्या नेत्यांकडून वेगवेळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया याबाबत देण्यात येत आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी या चौकशीतून खरा गुन्हेगार समोर येईलच. महाराष्ट्राची नाचक्की थांबण्यासाठी हा राजिनामा दिला असेल तर ते चांगलेच म्हटले पाहिजे.

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘गृहमंत्री अनिल देखमुखांचा राजीनामा ठाकरे सरकारची घसरलेली पत दाखवतो. सचिन वाझेला पाठीशी घालणारा एक नेता तरी मंत्रिमंडळातून कमी झाला.’ अशा शब्दांत त्यांनी सरकारला फटकारले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजिनाम्यानंतर महाराष्ट्राचा नवा गृहमंत्री कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात दिलीप वळसे- पाटील, जयंत पाटील इत्यादी नावे शर्यतीत आहेत.

Exit mobile version