पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पोलीस महासंचालकांनी राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य सरकारला अहवाल सोपवला असल्याची माहिती मिळत आहे. “वन मंत्री संजय राठोड यांची चौकशी न करता हा अहवाल बनवलाच कसा?” असा सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. “जोपर्यंत संजय राठोड यांची चौकशी होत नाही, तोपर्यंत या अहवालाला काडीचीही किंमत नाही.” असेही त्या म्हणाल्या.
पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांनी DG @MahaPolice व @NCWIndia कडे अहवाल दिल्याचे समजते
परंतु
मुख्य संशयीत आरोपी मंत्री संजय राठोडची चौकशी न करता हा अहवाल पुर्ण होऊचं शकत नाही
विविध मंत्र्यांच्या तो संपर्कात आहे अस ते म्हणतात तर त्यांच्याकडून पत्ता घेतं पोलिसांनी चोकशी करावी pic.twitter.com/pmruq1zQMM— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 19, 2021
चित्रा वाघ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पूजा चव्हाण प्रकरणाच्या अहवालावरून राज्य सरकारवर कडाडून हल्ला केला. “संजय राठोड यांची चौकशी न करता अहवाल सादर झालाच कसा?” असा सवाल वाघ यांनी केला. “पूजा चव्हाण प्रकरणात १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यात राठोड यांचे अरुण राठोड आणि विलास नावाच्या तरुणांसोबत संभाषण आहे. त्यात पूजाला आत्महत्येला परावृत्त करण्यापासून ते आत्महत्या झाल्यानंतर दरवाजा तोड पण मोबाईल घे… इथपर्यंतचं संभाषण आहे. त्याची चौकशीही करण्यात आली नाही. त्यामुळे राठोडांच्या चौकशीशिवाय हा अहवाल बनूच शकत नाही. कारण मुख्य आरोपची चौकशी नाही. किंबहुना ते बेपत्ता आहेत. असे त्या म्हणाल्या.
हे ही पहा:
पूजा चव्हाण प्रकरणात १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्याची शहानिशा कोण करणार? या क्लिपची चौकशी न करताच अहवाल दिला कसा? असे सवाल करतानाच जोपर्यंत या प्रकरणात संजय राठोड याची चौकशी होत नाही, तोपर्यंत या अहवालाला काडीचीही किंमत नाही, असेही त्या म्हणाल्या.